ETV Bharat / city

Pakistan Zindabad Slogans In Pune : PFI आंदोलनावेळी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Sep 24, 2022, 12:12 PM IST

Updated : Sep 24, 2022, 12:54 PM IST

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा,( Pakistan Zindabad slogans in Pune ) पोलिसांकडून अशा घोषणा दिल्या नसल्याची माहिती मात्र, व्हिडिओ व्हायरल

Pakistan Zindabad Slogans In Pune
पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

पुणे : पुण्यासह राज्यभरात एनआयएनएने छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( Popular Front of India ) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ काल पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने ( Popular Front of India Protests in Pune ) पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ( Pakistan Zindabad ) करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे ( Pakistan Zindabad slogans in Pune ) लावण्यात आल्याची तक्रार केली आहे. तसेच नितेश राणे यांनी या प्रकरणी चुन चुन के मारेंगे असे ट्विट केले आहे. त्यामुळे हा मोर्चा आता वादामध्ये सापडलेला असल्याचे पहायला मिळत आहे.

PFI आंदोलनावेळी पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

पोलिसांचा नकार - या संदर्भात माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ( Pune Police Commissioner Amitabh Gupta ) पोलीस उपायुक्त सागर पाटील ( Pune Police Deputy Commissioner Sagar Patil ) यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारच्या कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारची अफवा देखील कोणीही पसरवू नये असे आवाहन देखील आयुक्तांकडून करण्यात आले आहे.

  • To all those shouting Pakistan Zindabad slogans in support of PFI in Pune..

    Chun chun ke marenge.. Itna yaad rakana!!! #BanPfi

    — nitesh rane (@NiteshNRane) September 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकू येत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे खरोखरीच या घोषणा देण्यात आल्या की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुणे पोलिसांकडून या संदर्भात पुढील तपास सुरू करण्यात आला असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवता शांतता बाळगावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Last Updated : Sep 24, 2022, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.