ETV Bharat / city

सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प - प्रवीण दरेकर - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

कोरोना काळात आर्थिक घडी विस्कटलेली असून ती सुरळीत करणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारे हे केंद्रीय बजेट असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे.

-pravin-darekar-on-onion-budget
-pravin-darekar-on-onion-budget
author img

By

Published : Feb 1, 2021, 5:17 PM IST

Updated : Feb 1, 2021, 5:30 PM IST

पुणे - कोरोना काळात आर्थिक घडी विस्कटलेली असून ती सुरळीत करणारा हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांना दिलासा देणारे हे केंद्रीय बजेट असल्याचे मत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. ते, लोणावळा शहरात शिवक्रांती कामगार संघटनेने आयोजित केलेल्या कामगार मेळाव्याप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, शिवक्रांती कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय पाळेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना दरेकर
आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न -यावेळी दरेकर म्हणाले की, शेतकऱ्यांना, आरोग्य व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी अडीच लाख कोटीपेक्षा अधिक तरतूद केली आहे. ज्या विषयांना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे त्यांचा समावेश आहे. कोरोना काळातील आर्थिक घडी सुरळीत होण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झाला आहे. उद्योग जगतासाठी मोठी तरतूद केली आहे. त्याचा फायदा कामगारांना होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Last Updated : Feb 1, 2021, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.