ETV Bharat / city

Ajit Pawar Criticized Shinde Government : पेट्रोल डिझेलचे कमी केलेले दर अत्यंत तुटपुंजी स्वरुपाचे - अजित पवार

सरकार बदलल्यानंतर काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत, असा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहे. पेट्रोल डिझेलचे दर ( Petrol diesel rates ) जे कमी केले आहेत ते अतिशय तुटपुंजी स्वरूपातील केल्या आहेत. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना जास्त होईल, असे वाटत नाही, अशी टीका देखील विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी केली आहे.

Ajit Pawar Criticized Shinde
Ajit Pawar Criticized Shinde
author img

By

Published : Jul 14, 2022, 9:18 PM IST

Updated : Jul 14, 2022, 9:31 PM IST

पुणे - शिंदे सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले आहेत. पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त केले आहे. यावर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आपल मत व्यक्त केले आहे. मी अडीच वर्ष अर्थमंत्री असताना मागच्या अर्थसंकल्पात गॅसच्या किंमतीबाबत टॅक्स साडे तेरा टक्के कमी केले आहे. त्यावेळेस आज सत्तेत असलेले लोक त्यावेळी विरोधात जेव्हा होते तेव्हा म्हणायचे की राज्य सरकार जेवढं पेट्रोल आणि डिझेलला ( Petrol diesel rates ) टॅक्स लावत आहे. त्याच्या 50 टक्के टॅक्स हा कमी केल पाहिजे, अशी मागणी ते करत होते. आज ते सरकारमध्ये आहे तर त्यांनी का पेट्रोल आणि डिझेलच टॅक्स 50 टक्के कमी केले नाही. पेट्रोल डिझेलचे दर ( Petrol diesel rates ) जे कमी केले आहेत ते अतिशय तुटपुंजी स्वरूपातील केल्या आहेत, अशी टीका विरोधीपक्ष नेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी केली आहे.

प्रतिक्रिया देताना विरोधीपक्ष नेते अजित पवार

आज 3 आणि 5 रुपयांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या पण सातत्याने केंद्र सरकार हे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करत आहे. आज सर्वच घटकातील लोक हे भेटून सांगतात की दादा तुम्ही टॅक्स कमी केला पण केंद्राने वाढवल्याने पुन्हा आहे तेच दर राहिले. सरकार बदलल्यानंतर काहीतरी आम्ही नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत, असा केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहे. पेट्रोल डिझेलचे दर जे कमी केले आहेत ते अतिशय तुटपुंजी स्वरूपातील केल्या आहेत. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना जास्त होईल, अस वाटत नाही, अशी टीका देखील यावेळी पवार यांनी केली.

सध्या आपत्ती व्यवस्थापनासाठी संचालक नेमतात. तो देखील आत्तापर्यंत नेमण्यात आलेला नाही. मदत पुनर्वसनसाठी जे पूर्णवेळ सचिव नेमल पाहिजे ते देखील नेमण्यात आलेल नाही. एकप्रकारे हे यांचे अपयश आहे. सध्या हे दोघेच अख्या महाराष्ट्राचे मालक झालेले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचे हा सर्वस्वी अधिकार हा राज्यातील मुख्यमंत्री यांचा आहे. राज्यात 165 आमदारांचा पाठबळ असताना देखील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी हे का घाबरत आहे कोणी यांना थांबवलं आहे. कुठ घोड हे पेंड खात आहे. हे देखील राज्याच्या जनतेला कळाल पाहिजे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

सध्या राज्यात पाऊस सुरू आहे. धरणाची परस्थिती चांगली आहे. तीन जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला आहे. खडकवासला भरले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सरकारने भरीव मदत करण्याची वेळ आलेली आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघाचीच कॅबिनेट चाललेली आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष बाबत निवडून आल्यावर अडचणी येतात. मानसन्मान मिळत नाही. नगराध्यक्ष एकटे पडतात हा निर्णय लोकशाहीला मारक असा निर्णय, या दोघाच्या मनात आले परत निर्णय घेतला, अशी टीका देखील यावेळी पवार यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

हेही वाचा - Petrol Diesel Rate in Maharashtra : राज्यात पेट्रोल ५ आणि डिझेल ३ रुपयांनी होणार स्वस्त- मंत्रिमंडळाचा निर्णय

Last Updated : Jul 14, 2022, 9:31 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.