ETV Bharat / city

PMC Online Fraud : ऑनलाइन फसवणुकीचे जाळे आता पुणे महापालिकेत, अधिकाऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक - Online fraud of PMC officials

मागील काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Frauds incident Hike) घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. एक फोन कॉल येतो आणि क्षणात बँक खाते रिकामे होऊन जाते. आपल्या अवतीभवती दररोज अशा घटना घडत आहेत. आता तर हा प्रकार चक्क पुणे महापालिकेतील (Online Fraud in PMC) बड्या अधिकाऱ्यांसोबतच घडला आहे.

pune cyber file photo
पुणे सायबर फाईल फोटो
author img

By

Published : Apr 27, 2022, 5:16 PM IST

Updated : Apr 27, 2022, 6:22 PM IST

पुणे - ऑनलाइनच्या जमान्यात सायबर घटनादेखील तितक्याच वाढल्या आहेत. प्रत्येक माणूस दिवसातील बहुतांश वेळ हा स्मार्टफोन वापरण्यात घालतो. दिवसभरात त्याच्या मोबाईलवर मेसेजेस, कॉल येत असतात. परंतु मोबाईलचा अतिवापर कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Frauds incident Hike) घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. एक फोन कॉल येतो आणि क्षणात बँक खाते रिकामे होऊन जाते. आपल्या अवतीभवती दररोज अशा घटना घडत आहेत. आता तर हा प्रकार चक्क पुणे महापालिकेतील (Online Fraud in PMC) बड्या अधिकाऱ्यांसोबतच घडला आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

काय आहे प्रकरण - गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यात सायबर हल्ले होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. आता तर थेट पुणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच (Online fraud of PMC officials) सायबर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. सायबर चोरट्यांनी पुणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांचे नाव वापरून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पैसे उकळले आहेत.

हेही वाचा - Mobile App Fraud Case : मोबाइल ॲपच्या माध्यमातून व्यावसायिकाची फसवणूक; कर्जाचे दिले आमिष

पुणे महानगरपालिकेच्या माजी आयुक्तांचे नाव आणि फोटो वापरून पालिकेतील मुख्य अभियंत्याची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. माजी आयुक्त कुणाल कुमार यांचा फोटो वापरून व्हॉट्सॲपवरुन मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांची फसवणूक झाली आहे. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दिली म्हणून ही माहिती उघड झाली. पण पालिकेत अनेक अधिकाऱ्यांना हा गंडा घालण्यात आला आहे. पण अधिकारी समोर येऊन बोलण्यास तयार नाहीत.

काय सांगते आकडेवारी - 2021 या एका वर्षात पुण्यात एकूण 19 हजार 23 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. जे गेल्यावर्षी 14 हजार 950 इतके होते, तर दोन वर्षाच्या तुलनेत 2019 साली या गुन्ह्याची संख्या 7795 इतकी होती. म्हणजे प्रत्येक वर्षी सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये ही होत असलेली वाढ चिंता वाढवणारी आहे. सायबर गुन्ह्यांत ऑनलाईन फ्रॉड ही सर्वात मोठी समस्या आहे. कारण सायबर मधील 70 टक्के गुन्हे हे ऑनलाईन फ्रॉडचेच आहेत.

सध्या ऑनलाइन फसवणूकीच्या घटना सातत्याने वाढत असल्याने सायबर पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. वारंवार आवाहन करूनही नागरिक ऑनलाइन फसवणूकीच्या जाळ्यात अडकत आहेत. दरम्यान, पालिकेत घडलेल्या घटनेमागे कुठली टोळी आहे का आणि किती अधिकाऱ्यांची फसवणूक झाली याचा तपास पुणे सायबर पोलीस करत आहेत.

हेही वाचा - Online fraud : ऑनलाईन थाळी बुक करणे पडले महाग, 89 हजारांची झाली फसवणूक

Last Updated : Apr 27, 2022, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.