ETV Bharat / city

दिवाळी निमित्त भिमाशंकर मंदिरात विद्युत रोषणाई; शिवलिंगाला फुलांचा शृंगार

कोरोना संकटात देशातील धार्मिकस्थळे, मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली असली तरी देवतांचे धार्मिक विधी हे नित्य नियमाने पार पाडले जात आहेत. सध्या दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिरात दिवळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Bhimashankar Temple Pune
भिमाशंकर मंदिरात विद्युत रोषणाई
author img

By

Published : Nov 15, 2020, 2:12 AM IST

पुणे- कोरोना संकटात देशातील धार्मिकस्थळे, मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली असली तरी देवतांचे धार्मिक विधी हे नित्य नियमाने पार पाडले जात आहेत. सध्या दिवाळीचा उत्सव साजरा होत असताना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर मंदिरात दिवळीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, शिवलिंगाभोवती रांगोळी, विविध रंगांच्या फुलांनी सजावट करण्याता आली आहे. या सर्वांमुळे मदिर परिसर उठून दिसत आहे.

भिमाशंकर मंदिरात विद्युत रोषणाई

देऊळ बंद तरी परंपरा जपल्या....

भिमाशंकर मंदिर गेल्या सात महिन्यांपासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असले, तरी भिमाशंकर शिवलिंगाची आरती, पूजा नित्यनियमाने सुरू आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक सण, उत्सव शासकीय नियमांचे पालन करून परंपरेप्रमाणे भिमाशंकर मंदिरात पार पाडले जातात. या पार्श्वभूमीवर दिपावलीच्या सुरुवातीला संपूर्ण मंदिर पाण्याने धुऊन काढण्यात आले. प्रत्येक दिवशी गाभाऱ्यात व सभामंडपात रंगोळी काढण्यात आली व गाभाऱ्याला विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले.

लक्ष्मीपूजन निमित्त शिवलिंगाला फुलांचा शृंगार...

भिमाशंकर मंदिर व परिसरात जंगलवस्ती असल्याने या परिसरात कुठल्याच सुखसुविधा उपलब्ध नाही. असे असतानाही पुजारी व गुरव यांच्या मदतीने मंदिराला विद्युत रोषणाईने सजवण्यात आले. त्यामुळे, दिवाळी सणात मंदिराचा वेगळाच थाट पाहायला मिळाला. काल लक्ष्मीपूजन निमित्त शिवलिंगाला फुलांचा शृंगार करण्यात आला होता.

आदिवासींचे अर्थकारण ठप्प..

भिमाशंकर परिसरातील आदिवासी नागरिकांचे अर्थकारण हे भिमाशंकर मंदिरावर अवलंबून आहे. यामध्ये पर्यटनाचाही मोठा हातभार लागते. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून मंदिर दर्शनासाठी बंद आहे व भिमाशंकर परिसरात पर्यटनालाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, या परिसरातील दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आदिवासी नागरिकांवर आली. त्यामुळे, यंदाची दिवाळी साजरी होत असताना उत्साह चांगला असला, तरी आदिवासी नागरिकांचे अर्थकारण मात्र ढासळले आहे.

हेही वाचा- बारामतीत तरुणांनी उभारली राजगड किल्ल्याची भव्य प्रतिकृती, किल्ला पाहण्यासाठी गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.