पुणे मी मुख्यमंत्री असताना सुरेश कलमाडी ( Former Congress Leader Suresh Kalmadi ) यांनी मला या पुणे फेस्टिव्हलमध्ये निमंत्रित केले होते. मी तेव्हा निघालो होतो आणि येथे पोहचता पोहचता उपमुख्यमंत्री झालो. मी पहिल्यांदा बोलून इथून जाण्याची परवानगी मागितली. कारण कार्यक्रम संपेपर्यंत उपमुख्यमंत्र्याचा मंत्री झालो आणि मंत्र्याचे आमदार झालो तर कोण रिस्क घेणार, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy CM Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन ३४व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अध्यक्षतेखाली गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या उद्घाटन सोहळ्यात खासदार उदयनराजे ( MP Udayanaraje ), खासदार गिरीश बापट ( MP Girish Bapat ), अभिनेते सुनील शेट्टी ( Actor Sunil Shetty ) आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे फेस्टिव्हलमध्ये भारतरत्नांना आदरांजली पुण्याचे नाव जागतिक उद्योग नकाशावर नेणारे व पुणे फेस्टिव्हलशी प्रथम वर्षापासून जोडले गेलेले ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण कै. राहुल बजाज यांच्या पवित्र स्मृतीस यंदाचा ३४वा पुणे फेस्टिव्हल अर्पण करण्यात आला आहे. यंदा पुणे फेस्टिव्हलमध्ये भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा, पद्मविभूषण अभिनेते दिलीप कुमार आणि शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहणारे कार्यक्रम झाले. यावेळी पुणे फेस्टिव्हलच्या पॅट्रन अभिनेत्री नृत्यांगना खा. हेमा मालिनी यांनी यंदा उद्घाटन सोहळ्यात गणेश वंदना सादर केली.
पुणे फेस्टिव्हल अवॉर्डने गौरव यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे, एन. ए. ए. सी. (नॅक) चे चेअरमन डॉ. भूषण पटवर्धन, प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना 'पुणे फेस्टिव्हल अवॉर्ड’ने उद्घाटन सोहळ्यात गौरविण्यात आले. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व सिंबायोसिसचे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार यांना या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणाऱ्या पुण्यातील चैतन्य मंडळ (डेक्कन जिमखाना) आणि राजर्षी शाहू मंडळ (शुक्रवार पेठ) या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सत्कार करण्यात आला.
भव्य उद्घाटन सोहळा पुणे फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळादेखील दरवर्षीप्रमाणे नेत्रदीपक असेल. ढोल-ताशांचा गजरात दीपप्रज्वलन व तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अभिनेत्री नृत्यांगना हेमा मालिनी गणेश वंदना सादर करून ३४व्या पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात केली. ज्येष्ठ गायक शंकर महादेवन यांच्या नव्या गीतावर आधारित २५ सहकलावंतांसह त्यानी गणेश वंदना सादर केले.
लता दीदींचे प्रसिद्ध गाणी केली सादर भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांची भाची व गायिका राधा मंगेशकर ‘मोगरा फुलला’ आणि ‘जय देव जय देव जय शिवराय’ ही गाणी सादर करून आदरांजली वाहिली. भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना त्यांचे शिष्य पं. उपेंद्र भट ‘तीर्थ विठ्ठल’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ या अभंगांद्वारे श्रद्धांजली अर्पण केलं.‘स्वरस्वप्न’ ग्रुप तर्फे ७ ते २२ वर्षे वयोगटातील ४० मुले व मुली भारतरत्न (कै.) लता मंगेशकर आणि पद्मविभूषण (कै.) पं. शिवकुमार शर्मा यांना सामूहिक व्हायोलिनद्वारा श्रद्धांजली अर्पण केली. याचे संगीत संयोजन स्वप्ना दातार यांनी केले आहे. १९५७चे ‘आझाद’ चित्रपटातील ‘राधा ना बोले ना बोले ना बोले रे...’ हे लता दीदींचे प्रसिद्ध गाणे आणि ‘शिवहरी’ या जोडीने अजरामर केलेली राग हंसध्वनीमधील ‘जा तोसे नही बोलू कन्हैया’ हे द्रुत त्रितालमधील शास्त्रीय बंदिश ‘झाला’ पद्धतीत व्हायोलिनवर सादर केले.
महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे विलोभनीय दर्शन यंदा महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे विलोभनीय दर्शन घडवणारा ‘खेळ मांडीयेला..’ हा दिंडीचा विशेष कार्यक्रम ६० वारकऱ्यांनी सादर केला. हे वारकरी प्रेक्षकांतून दिंडी घेऊन मंचावर रिंगण केले. त्यानंतर फुगड्या, पाऊल्या, वाटचालीचा अभंग, ज्ञानोबा-तुकारामांचा गजर करीत पखवाज, वीणा, टाळ तसेच पताका-झेंडे याद्वारे वारीचे दर्शन घडवला. डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे आणि ज्ञानेश्वर माउलींचे पुजारी अवधूत गांधी यांनी याचे दिग्दर्शन व सादरीकरण केले आहे. यानंतर ‘कल्चर्स ऑफ इंडिया’ हा महाराष्ट्र, राजस्थान आणि पंजाब या राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर झाला. ‘पिंगा’ (मराठी), ‘घुमर’ (राजस्थानी) आणि ‘भांगडा’ (पंजाबी) याद्वारे सादर होणाऱ्या कार्यक्रमात मीरा जोशी, मधुरा देशपांडे आणि नुपूर दैठणकर या तीन अभिनेत्री नृत्याविष्कार सादर केले. याची संकल्पना, निर्मिति व दिग्दर्शन स्वप्नील रास्ते यांनी केले आहे.
मिले सूर मेरा तुम्हारा धुनवर कार्यक्रम सादर यानंतर ‘आपला अतुल्य भारत’ या संगीत व नृत्यमय कार्यक्रमात ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या मधुर धूनवर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, झारखंड, मणिपूर, मिझोराम व केरळ येथील कलावंत आपापल्या राज्यातील संस्कृती, परंपरा, वेशभूषा, दागिने, पारंपारिक वाद्ये आणि विविध नृत्य प्रकार एकत्रित सादर करून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवला. यामध्ये सत्रीय नृत्यांगना डॉ. देविका बोरठाकूर, भरतनाट्यम् नर्तक डॉ. परिमल फडके यांसह ६० हून अधिक विविध राज्यातील कलाकार सहभागी झाले होते. याचे दिग्दर्शन डॉ. देविका बोरठाकूर आणि कुणाल फडके यांनी केले असून, संकल्पना संयोजन करूणा पाटील यांनी केले आहे.
स्कूल ऑफ लिबरल आर्टस्चे कलावंतांची साथसंगत उद्घाटन सांस्कृतिक कार्यक्रमात शेवटी ‘लावणी एक - रूप अनेक’मध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले, शर्वरी जमेनिस, आर्या परदेशी व मानसी नाईक या महाराष्ट्राची लावणी, गुजरातचा गरबा आणि दक्षिणेकडील टॉलीवूड फ्युजन नेत्रदीपक नृत्यातून बहारदार नृत्याविष्कार सादर केले. अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाच्या डायरेक्टर नृत्यदिग्दर्शिका निकिता मोघे यांनी याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. या वेळी पायल वृंद चे कलावंत तसेच व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्टस्चे कलावंत ही साथ सांगत दिली.
पुण्यामध्ये एकापेक्षा एक नररत्नांच्या खाणी यावेळी फडणवीस म्हणाले की, मला असे वाटतं की, खऱ्या अर्थाने गेल्या 34 वर्षांमध्ये या पुण्याला एक वेगळी ओळख या पुणे फेस्टिव्हलने दिली आहे. आपण इतिहासामध्ये वाचले होते की परकीय आक्रमण झाले आणि गाढवाचा नांगर याच्यावर फिरवला आणि आई जिजाऊंच्या आशीर्वादाने छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवून पुण्याला पुन्हा एक नवीन ओळख करून दिली. तो छत्रपती शिवरायांचा जो सोन्याचा नांगर होता तो इतका पावरफुल होता की, तेव्हापासून येथे नर रत्नांची खाण सुरू झाली आहे. या पुण्यामध्ये आपल्याला एकापेक्षा एक असे समाज बदलणारे आणि खऱ्या अर्थाने लोकांना प्रेरणा देणारे सर्व क्षेत्रांतील लोक पाहायला मिळतात.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, जसे पुणे विद्याचे माहेरघर आहे. तसे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी नाही तर खऱ्या अर्थाने देशाची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यामुळे पुण्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा परिणाम हा सगळ्या देशावर होत असताे. छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, या प्रत्येकाने या भूमीतून या देशाला एक दिशा देण्याचा प्रयत्न केला.
पुणे फेस्टिव्हल आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवले पुढे ते म्हणाले, मला विशेष रूपाने या गोष्टीचा आनंद आहे की, आपल्या समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन जर करायचे असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये जास्तीत जास्त प्रोत्साहित केले पाहिजे. ते म्हणजे आपले संगीत, नृत्य, नाटक संस्कृती, क्रीडा आणि कला ही क्षेत्र आहे. खरोखर पुणे फेस्टिव्हल हा पुण्यापुरता किंवा महाराष्ट्रापुरता नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवला आणि 34 वर्ष यशस्वी आणि चांगले कार्य केले याबद्दल मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो. मला माहिती आहे की, एखादा कार्यक्रम करताना किती कष्ट घ्यावे लागतात.
मराठी साहित्य किंवा मराठी संस्कृतीचा मला सार्थ अभिमान मी तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगेल की, मी अनेक वर्षांपासून आता महाराष्ट्राच्या बाहेर काम करतो. पण, मला मी तुम्हाला हे बाहेरही बोलतो आणि इथे ही प्रामाणिकपणे सांगतो की, मराठी संगीत, मराठी नृत्य, मराठी नाटक, मराठी साहित्य किंवा मराठी संस्कृती संपूर्ण भारतात मराठीसारखे खाद्यापासूनच सगळ्या गोष्टी मराठी आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आणि हे असेच वैभव टिकवण्याचा प्रयत्न आपण सातत्याने करीत आहात असेदेखील यावेळी गडकरी म्हणाले.
हेही वाचा JDU MLA Join BJP : नितीशकुमारांना धक्का; मणिपूरमधील JDU चे पाच आमदार भाजपमध्ये दाखल