ETV Bharat / city

Without Potholes Road Pune 46 वर्षांपूर्वीचा एकही खड्डा नसलेला पुण्यातील एकमेव रस्ता - पुण्यातील जंगली महाराज रोड खड्डा नसलेला

46 वर्षांमध्ये एकही खड्डा न पडलेला आणि 46 वर्षांमध्ये एकही खिळा त्या रस्त्यावर न मारलेला असा एक रस्ता जंगली महाराज रोड पुणे येथे आहे जंगली महाराज रोड ते बालगंधर्व चौक डेक्कनपर्यंत हा रस्ता 46 वर्ष झाले या रस्त्यामध्ये एकही खड्डा नाही आणि इतर रस्ते जेवढे वाहनाचा भार घेतात तेवढ्याच भार हा रस्ताही घेतो

Without Potholes Road Pune
Without Potholes Road Pune
author img

By

Published : Aug 16, 2022, 3:45 PM IST

Updated : Aug 16, 2022, 4:05 PM IST

पुणे पावसाळ्यात रस्ते आणि खड्डे याचे समीकरण हे गणितातल्या सूत्रासारखेच असते पाऊस आला की खड्डे पडणार पण खड्डे नसणारे रस्तेही भारतात तयार होतात आणि ते 46 वर्ष टिकतात हे एक आश्चर्य आहे 46 वर्षांमध्ये एकही खड्डा न पडलेला आणि 46 वर्षांमध्ये एकही खिळा त्या रस्त्यावर न मारलेला असा एक रस्ता जंगली महाराज रोड पुणे येथे आहे जंगली महाराज रोड ते बालगंधर्व चौक डेक्कनपर्यंत हा रस्ता 46 वर्ष झाले या रस्त्यामध्ये एकही खड्डा नाही आणि इतर रस्ते जेवढे वाहनाचा भार घेतात तेवढ्याच भार हा रस्ताही घेतो

तत्कालीन स्थायी समिती सभापतीशी प्रतिनिधींनी साधलेला संवाद

1973 ला महाराष्ट्रसह पुण्यातील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि पुण्यामधील रस्त्याची दुरावस्था झाली. त्याचवेळी हा रस्ता करण्याचे तत्कालीन महानगरपालिकेचे पदाधिकाऱ्याने ठरवले. पावसामुळे सगळेच रस्ते बिकट अवस्थेत असताना त्यावेळेसचे स्थायी समितीचे सभापती श्रीकांत शिरोळे असे सांगतात की आमच्या असे ठरलेले होते की रस्ता तर बनवायचा पण मुंबईपेक्षा कमी पाऊस पडतो पण मुंबईतले रस्ते चांगले आहेत, अशी कंपनी शोधायची जी रस्त्याची खात्री देईल आणि रस्ता चांगला होईल. आज काल रस्त्याचे काम करत असताना कंत्राटदार सरकारला अटी घालतात. परंतु पारशी बंधूंची एक कंत्राटदार कंपनी होती. पारशी दोन बंधू असणारे रिकाडो नावाची एक कंपनी होती. ज्या कंपनीने हा रस्ता बनवताना महानगरपालिकेलाच अटी घातल्या. त्या आठवणी त्यांनी सांगितले की या रस्त्यावर तुम्ही दहा वर्षे एकही खिळा मारायचे नाही. मंडप टाकायचे नाही आणि विना टेंडर काम द्यायचे आणि त्या पद्धतीने ते काम दिले गेले. तो रस्ता 46 वर्ष झाला आजही त्याच स्थितीत आहे.

आम्ही कुणाला पैसे खाऊ देणार नाही. तुम्ही म्हणाल तेवढे पैसे घ्या पण रस्ता आम्ही म्हणाल त्या उत्तम दर्जाचा करून द्या आणि त्या काळामध्ये या रस्त्याला पंधरा लाख रुपये महानगरपालिकेने दिले आणि रिकामी कंपनीने या रस्त्याची दहा वर्षाची गॅरंटी सुद्धा घेतली. दहा वर्षाची गॅरंटी असलेला हा रस्ता आज 46 वर्षे झाले आजही या रस्त्यावर एकही खड्डा पडलेला नाही, अशी प्रतिक्रिया तत्कालीन सभापती श्रीकांत शिरोळे यांनी दिली आहे.

हेही वाचा - Heavy Rain in Mumbai मुंबईतील अंधेरी दादर वांद्रे सह इतर भागांत जोरदार पाऊस जनजीवन विस्कळीत

Last Updated : Aug 16, 2022, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.