ETV Bharat / city

New Vaccine for Omicron : ...तर ओमायक्रॉनला रोखण्यासाठी तयार करावी लागणार नवीन लस, पुण्यात संशोधनाला सुरुवात

author img

By

Published : Dec 7, 2021, 12:05 PM IST

Updated : Dec 7, 2021, 1:19 PM IST

सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विविध प्रकारच्या लसींना ( NIV New Vaccine for Omicron ) कोरोनाचा नवीन व्हॅरिएंट ( Omicron New Covid Varient ) असलेला ओमायक्रॉन व्हायरस दाद देत नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत आहे. त्यामुळे पुण्यात याबाबत संशोधनाला सुरुवात करण्यात आली असून, ओमायक्रॉन व्हायरसने जुन्या लसींना दाद न दिल्यास ओमायक्रॉनसाठी नवीन लस तयार करावी लागेल, अशी प्रतिक्रिया इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे (IMA Ex President Dr. Avinash Bhondwe ) यांनी दिली आहे.

डॉ.अविनाश भोंडवे
डॉ.अविनाश भोंडवे

पुणे- ओमायक्रॉनच्या (Omicron) विषाणूमध्ये 50 म्युटेशन झाले आहेत. त्यातील 32 म्युटेशन हे स्पाईक प्रोटीनमध्ये (Spike Protein) झाले आहेत. या स्पाईक प्रोटिनमध्ये झालेल्या म्युटेशनमुळे या विषाणूवर कुठल्याही प्रकारच्या अँटिबॉडीजचा (Antibodies) परिणाम होत नाही. त्यामुळे आता ज्या लसी उपलब्ध आहे त्यांचा या व्हॅरिएंटवर परिणाम होत नाहीये, असा प्राथमिक अनुमान लावण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेत (South Africa) या व्हॅरिएंटमुळे लस 40 ते 50 टक्केच सरंक्षण देत असल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीने (National Institute of Virology) या लसींवर अभ्यास करायच ठरवलं आहे. त्यामुळे या संस्थेच्या माध्यमातून लसींची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे (Indian Medical Association) माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे (Dr. Avinash Bhondave) यांनी दिली.

डॉ.अविनाश भोंडवे
कोणती लस प्रभावी ठरणार यासाठी संशोधन सुरुनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीच्या माध्यमातून या लसींवर संशोधन करण्यात येत आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. जर या लसीचा परिणाम हे कमी प्रमाणात होत असेल तर पुढील काळात ओमायक्रॉनला रोखू शकेल अशी नवीन लस तयार करावी लागेल. अमेरिकेतील एका कंपनीने असं जाहीर केलं आहे की, ते या ओमायक्रॉनवर नवीन लस तयार करणार आहेत (A US company has announced that it will develop a new vaccine on the omicron). या संशोधनातून असं ही लक्षात येईल की, या नवीन व्हेरियंटला रोखण्यासाठी कोणती लस प्रभावी ठरणार आहे, असं देखील यावेळी भोंडवे म्हणाले.कोविशिल्डचा परिणाम कमी होऊ शकतोकोविशिल्ड (Covishield) ही लस स्पाईक प्रोटीनपासून बनवण्यात आलेली आहे. त्यामुळे कदाचित स्पाईक प्रोटीन बदलल्यामुळे कोविशिल्डचा परिणाम कमी होईल, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. तर कोव्हॅक्सिन (Covaxin) ही पूर्णपणे डेड व्हायरसने (Dead Virus) तयार करण्यात आली असल्याने त्याचा परिणाम ओमायक्रॉनवर जास्तीत जास्त होईल, असा अनुमान आहे. 3 आठवड्यात हे संशोधन पूर्ण झालं की, या लसींबाबत कळेल आणि पुढील नियोजन करता येईल, असं भोंडवे यांनी यावेळी सांगितलं.

Last Updated : Dec 7, 2021, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.