पुणे - कमी वेळेत देशात विश्वास संपादित करण्याचे काम एनडीआरएफच्या ( NDRF ) जवानांनी केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Central Home Minister Amit Shah ) यांनी केले आहे. पुण्यातील केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन अमित शाह यांच्या ( Amit Shah Pune Visit ) हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, भूकंप असो किंवा पूर एनडीआरफचे जवान त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर तेथील नागरिक समाधान व्यक्त करतात. कमी वेळात देशातील नागरिकांचे विश्वास संपादन करणे खून कठीण कार्य असते. आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहून आपल्या जीवाची पर्वा न करता एनडीआरफ जवान आपत्तीच्या वेळी लोकांचे जीव वाचवण्यासाठी झटत असतात. केवळ आपल्याच देशात नाही तर इतर देशातही एनडीआरएफच्या जवानांनी आपल्या कामामुळे लोकांच्या मनातमध्ये एनडीआरएफबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
हे ही वाचा - Amit Shah Pune Visit :...म्हणून अमित शहा यांना पुणे दौरा करावा लागतोय - माजी आमदार मोहन जोशी