ETV Bharat / city

NCP Protests In Pune : राष्ट्रवादीचे भरपावसात पुणे महापालिकेसमोर धरणे आंदोलन

author img

By

Published : Sep 13, 2022, 12:47 PM IST

Updated : Sep 13, 2022, 1:12 PM IST

दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy Rain In Pune ) अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( Nationalist Congress Party ) वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर Pune Municipal Corporation भर पावसात मध्ये बसून आंदोलन ( NCP protest in Pune today ) करण्यात आला आहे.

NCP Protests In Pune
NCP Protests In Pune

पुणे - यावर्षीच्या पावसाळ्यात अगोदरच खड्डेमय असणारे पुणे शहर आता जलमय झालं आहे. पावसामुळे जागोजागी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठले आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy Rain In Pune ) अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी साचले असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. ड्रेनेज लाईन तुटलेल्या होत्या. अनेक ठिकाणी तर रस्त्यांना ओढ्याचे स्वरुप झाले होते. एकंदरीत पुणेकरांची कालच्या पावसाने दाणादाण उडविली. याचा निषेध म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( Nationalist Congress Party ) वतीने पुणे महापालिकेच्या बाहेर Pune Municipal Corporation भर पावसात मध्ये बसून आंदोलन ( NCP protest in Pune today ) करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे पुणे महापालिकेसमोर आंदोलन

स्मार्ट सिटी भाजपाने पाण्यात बुडवली - पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी पुणे शहर स्मार्ट करण्याची घोषणा केली होती. परंतु पुण्यातील भाजपाच्या कारभाऱ्यांनी मात्र पुणेकरांची दुर्दशा केली आहे. गेली पाच वर्षे मनपातील कारभार तर देशाच्या पंतप्रधांनानी दिलेल्या वचनाला हरताळ फासणारा होता. पुणेकरांची स्मार्ट सिटी भाजपाने पाण्यात बुडवून टाकली. याचा तसेच देशाच्या पंतप्रधानांचा शब्द खोटा ठरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज निदर्शने करण्यात येत आहे अशी, माहिती यावेळी आंदोलकांनी दिली. यावेळी भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बोटीत बसून महापालिका प्रशासन तसेच सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले.

Last Updated : Sep 13, 2022, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.