ETV Bharat / city

'पंतप्रधान मोदींना फक्त बारामतीचाच खासगी साखर कारखाना दिसतो का ?'

शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवले नाही असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यावर उत्तर देताना अजित पवार यांनी मोदी हे खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

अजित पवार
author img

By

Published : Apr 17, 2019, 4:48 PM IST

पुणे - शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवले नाही आणि स्वतःच्याच कारखान्यांची दुकानदारी चालवली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मात्र, हा धादांत खोटा आरोप आहे. पंतप्रधानांनी असे बोलणे बरोबर नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. नितीन गडकरी, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांचेही खासगी कारखाने आहेत. मग पंतप्रधानांना फक्त बारामतीचाच खासगी कारखाना दिसतो का, असा सवालही पवार यांनी यावेळी केला.

अजित पवार

बारामतीतील माळेगावातील प्रचार सभेत बुधवारी अजित पवार बोलत होते. सोलापूरमध्ये झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्यामुळेच साखर कारखानदारी अडचणीत आली. तसेच माढा आणि सोलापूर परिसरात दुष्काळाची परिस्थितीचे निराकरण करण्यात पवारांना अपयश आल्याची टीका मोदींनी केली. याला उत्तर देताना अजित पवार यांनी पंतप्रधान जे बोलतात ते बरोबर नाही, ते खोटे आरोप करत आहेत.

माढ्यात दुष्काळी परिस्थिती दूर करण्यात यश आल्याचे पंतप्रधान सांगत आहेत. मात्र याच भागात माढा सहकारी साखर कारखाना हा ऊस गाळप करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उसाचे उत्पादन होते ते पाणी आले म्हणूनच ना, असेही अजित पवार यावेळी म्हणाले. राज्यात आघाडीचे सरकार असताना नवीन सहकारी साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचे धोरण तसेच खासगी कारखान्यांना परवानगी न देण्याचे धोरण स्वीकारले होते. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या उसाचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्यांच्यात ताकद आहे, त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करुन खासगी साखर कारखाने काढावेत, असे सांगण्यात आले होते. आता तर परिस्थिती बघितली तर भाजपमधील अनेक नेत्यांचे खासगी साखर कारखाने आहेत. मोदी आता जातीवर भावनिक आवाहन करत आहेत, असेही पवार यावेळी म्हणाले.

Intro:mh pune 01 17 ajit pawar on modi avb 7201348Body:mh pune 01 17 ajit pawar on modi avb 7201348

Anchor
शरद पवारांनी ऊस उत्पादकांचे प्रश्न सोडवले नाही आणि स्वतःच्या कारखान्यांची दुकानदारी चालवली हा धादांत खोटा आरोप आहे पंतप्रधानांनी असे बोलणं बरोबर नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे ते बारामतीतील माळेगाव इथल्या प्रचार सभेत बोलत होते बुधवारी सोलापूर मध्ये झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली त्यांच्यामुळेच साखर कारखानदारी अडचणीत आली तसेच माढा आणि सोलापूर परिसरात दुष्काळाची परिस्थिती निराकरण करण्यात पवारांना अपयश आल्याची टीका मोदींनी केली याला उत्तर देताना अजित पवार यांनी पंतप्रधान जे बोलतात ते बरोबर नाही ते खोटे आरोप करत आहेत माढ्यात दुष्काळी परिस्थिती दूर करण्यात आपण यश आल्याचं पंतप्रधान सांगत आहेत मात्र याच भागात माढा सहकारी साखर कारखाना हा साडेबारा ऊस गाळप करतो एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उसाचे उत्पादन होतं ते मण्यात पाणी आलं म्हणूनच ना असे अजित पवार यावेळी म्हणाले राज्यात आघाडीचे सरकार असताना नवीन सहकारी साखर कारखान्यांना परवानगी न देण्याचे धोरण तसेच खासगी कारखान्यांना परवानगी न देण्याचे धोरण स्वीकारले होते मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादित होणाऱ्या उसाचे करायचं काय असा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्यांच्यात ताकद आहे त्यांनी शेतकऱ्यांना एकत्र करून खाजगी साखर कारखाने काढावे असं सांगण्यात आलं होतं आता तर परिस्थिती बघितली तर भाजपमधील अनेक नेत्यांचे खासगी साखर कारखाने आहेत त्यात नितीन गडकरी पंकजा मुंडे सुभाष देशमुख रावसाहेब दानवे अशा अनेकांचे खाजगी साखर कारखाने आहेत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त बारामतीचाच खाजगी साखर कारखाना दिसतो का असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी मोदींवर टीका केली मोदी आता जातीवर भावनिक आवाहन करत आहेत त्यांना फोन काय जाती बद्दल बोललो असा प्रश्नदेखील अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला
Byte अजित पवार, नेते राष्ट्रवादी काँग्रेसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.