पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन होणार ( PM Modi Pune Visit ) आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला ( Ncp Oppose To Pm Tour ). छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदींच्या हस्ते होत असलेल्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमाला राष्ट्रवादीने विरोध दर्शवला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मुक आंदोलन केले ( Ncp Agitation Pm Modi Tour ) आहे.
पुणे मेट्रोच्या अर्धवट कामाचे निव्वळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन पार पडत आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मोदींच्या हस्ते महापालिकेच्या आवारातील पुतळ्याचे अनवारण होत आहे. तसेच, छत्रपती शिवराय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल संतापजनक विधाने करणाऱ्या राज्यपालाची या कार्यक्रमाला असणारी उपस्थिती या सर्वांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अलका चौकात मुक आंदोलन केले. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी काळे कपडे घातले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, मोदी आता मेट्रोचे उद्घाटन नाहीतर फुलराणीचे उद्घाटन करायला आले आहे. कारण की ही मेट्रो सुद्धा फक्त पाच किलोमीटर साठीच आहे. अशा छोट्या कामासाठी मोदींनी आपल्या पंतप्रधान पदाचा मान राखला नाही हे दिसून येते, अशी टीका जगताप यांनी केली आहे.
असा असेल दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. त्यासोबत त्यांनी गरवारे मेट्रो स्थानकाचेही उद्घाटन केले आहे. आता ते तेथून आनंदनगर मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता एमआयटी कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत. तर, 1.45 ला सिम्बाय़सिस मधील आर के लक्ष्मण गॅलरीचे उद्घाटन करतील. दुपारी 3 वाजता पंतप्रधान पुण्याहून रवाना होणार आहे.
हेही वाचा - Nandi Drinking Milk : महादेवाचा नंदी दूध, पाणी पितो ही अंधश्रद्धा