पुणे - गेल्या काही महिन्यांपासून देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. महागाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. त्या म्हणाले की, आज देशात एक नव्हे दोन नव्हे तर चार पटीने महागाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज मला कै. सुषमा चव्हाण यांची आठवण होत आहे. तेव्हाही त्यांचे भाषण भावलं होत आणि आजही ते भाषण भावत आहे. त्यांनी आमच्या सरकारला विचारलं होत की आकडो से पेट नही भरता. तर जेव्हा भूक लागते तेव्हा रोटी लागते. मला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हाच प्रश्न विचारायच आहे की आकडो से भूक नही लगती जब भूक लगती है तब रोटी लगती है, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
त्या महिलांच काय? - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. देशाच्या पंतप्रधानाने आवाहन केल्याने आम्हा सर्वांनी गॅसची सबसिडी सोडून टाकली. पण ज्या महिलांसाठी ही सबसिडी सोडण्यात आली त्या महिलांना खरंच त्या सोडलेल्या साबसिडीचा फायदा झाला का, असा सवाल देखील यावेळी सुळे यांनी केला. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महागाई विरोधात शनिवार चौकातील शनी मारुती मंदिराच्याबाहेर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली.
फडणवीस यांनी जुनी भाषणे पाहावी - महागाईवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावर सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, फडणवीस यांना या विषयाचा प्रगल्भ अनुभव आहे. त्यांना याचा विसर पडला असेल की देशात भाजपाची सरकार आहे. जेव्हा आमचं सरकार होत आणि ते विरोधात होते तेव्हाचे त्यांचे भाषण पाहावी. त्यांना महागाई कशामुळे होते हे चांगलेच माहिती आहे, असा टोला देखील यावेळी सुळे यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
हेही वाचा - रोहित पवार यांनी घेतला विदर्भातील पुरणपोळीचा पाहुणचार; पुरणपोळी बनवण्याचाही केला प्रयत्न
पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी - माझी देवचरणी एवढीच मागणी आहे की केंद्र सरकारला सुबुद्ध दे आणि त्यांनी जे झोपायचं सोंग घेतलं आहे. नको त्या विषयाला महत्व देत आहे. हे दुर्दैवी आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी देशाच्या हितासाठी सगळं काही बाजूला ठेवून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था कशी टिकवता येईल यासाठी प्रयत्न करावे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्री यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढावा,असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.