ETV Bharat / city

Subodh Bhave : लायकी नसलेल्या राजकारण्यांच्या हाती देश उभारणीचे काम; सुबोध भावेची टीका - राजकारणी

ज्या राजकारण्यांची (Politicians) लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम देत आहोत. देश निर्माण करायचा असेल, तर पुढील पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल, असे विचार सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी मांडले.

सुबोध भावे
सुबोध भावे
author img

By

Published : Aug 2, 2022, 5:24 PM IST

पुणे: 'आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे. देश निर्माण करायचा असेल; तर पुढील पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल, अशी खंत व्यक्त करीत प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) यांनी राजकारण्यांवर (Politicians) टीकास्त्र सोडले.

‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘डीईएस-प्री प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना सुबोध भावे यांनी देशातील राजकारण्यांवर आणि राज्यपालांनी (Governor) नुकत्याच केलेल्या विधानावर सडकून टीका केली. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच 'मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत', अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात. असे वक्तव्य त्यांनी केले.

हल्ली आपण मुलांना हिंदी, मराठी गाण्यांवर नाचायला सांगतो. एखाद्या चित्रपटातील संवाद सादर करायला सांगतो. पुष्पा चित्रपटातील संवादांच्या सादरीकरणाचे खूळ आले आहे. ते करून देश घडणार नाही. याऐवजी जर मुलांना राष्ट्रपुरुषांचे विचार सादर करायला सांगितले; तर त्यांच्यामध्ये देशाबद्दल आत्मीयता निर्माण होईल, असेही त्यांनी यावेळी म्हणटले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.