ETV Bharat / city

सनातनचे वकील संजीव पुनाळेकरांचा जामीन मंजूर; या आहेत अटी - sanjiv punalekar

दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संजीव पुनाळेकरांवर आरोप आहे. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयाने विवीध अटी घालत हा निकाल दिला.

संजीव पुनाळेकर
author img

By

Published : Jul 6, 2019, 11:25 AM IST

पुणे - 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी ३० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयाने विवीध अटी घालत हा निकाल दिला.

सीबीआयने सचिन अंदुरे आणि 'हिंदू जनजागृती समिती'चा सदस्य वीरेंद्र तावडे यांना आधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीत जी माहिती समोर आली त्याआधारे संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना २५ मे रोजी अटक करण्यात आली होती. दाभोलकर हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

न्यायालयाने पुनाळेकर यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. यात सोमवार व गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात हजर राहणे, विनापरवानगी परदेशात जाऊ नये, साक्षीदारावर दबाव आणू नये, सीबीआयने बोलावल्यास हजर रहावे या अटींवर पुनाळेकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुनाळेकर यांच्यावतीने अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली.

Intro:अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले सनातनचे वकील संजीव पुनाळेकर यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायाधीश आर एम पांडे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. Body:न्यायालयाने पुनाळेकर यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. यामध्ये सोमवार व गुरुवारी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात हजर राहणे, विनापरवानगी परदेशात जाऊ नये, साक्षीदारावर दबाव आणू नये, सीबीआयने बोलावल्यास हजर रहावे या अटीवर पुनाळेकर यांना जामीन मंजूर करण्यात आला.
Conclusion:..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.