पुणे - शिवसेनेचे आमदार संजय राठोड ( Shiv Sena MLA Sanjay Rathod ) यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार असल्याचे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ ( BJP leader Chitra Wagh ) यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील थेऊर ( Theur ) येथील यशवंत सहकारी साखर काराखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीची दगडाने ठेचून हत्या झाल्याची घटना काल उघडकीस आली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणार का ? - शिवसेनेचे बंडखोर नेते आमदार एकनाथ शिंदे आणि भाजपने एकत्रित येऊन सत्ता स्थापन केली. मात्र, तरीही चित्रा वाघ शिवसेनेच्या आमदारांवर नेत्यांवर आरोप करणार का असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारण्यात आला तेव्हा भाजपा नेत्या चित्रा वाघ यांना केला असता त्यांनी हे म्हटले आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहे. असे असताना देखील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून राज्यातील महिलांवर अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या विरोधात माझा लढा चालूच राहणार असल्याचे भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितले.
पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह - 24 तास उलटूनही या प्रकरणात धागदोरे हाती न लागल्याने स्थानिक पोलिसांच्या तपासावर देखील त्यांनी यावेळी प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. यावर चित्रा वाघ यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलिस आयुक्तांना जाऊन विचारावा, मी माझी लढाई अजून ही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल आहे. तसेच पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोडला क्लिन चिट दिली. याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. त्याच बरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही. अस यावेळी वाघ म्हणाल्या.
न्यायालयाच्या अटींचा रघुनाथ कुचिक यांच्याकडून भंग - शिवसेनेचे माजी आमदार रघुनाथ कुचिक यांच्या विषयी बोलताना न्यायालयाने जामीन देताना घालून दिलेल्या अटींचा भंग कूचिक यांनी केला आहे. तरी देखील, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्या बाबत देखील माझा लढा सुरू असून त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय व जामीन रद्द केल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच औरंगाबाद येथील घटनेतील तरुणीला देखील न्याय मिळाला नाही.त्याबाबत देखील माहिती राज्यातील जनते समोर येईल, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.