ETV Bharat / city

पुण्याच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ; भाजपकडून अधिकृत घोषणा

भाजपकडून महापौर पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का, याबाबत उत्सुकता असतानाच मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर झाल्याने अन्य नेत्यांच्या आशा मावळल्या आहेत.

महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले
author img

By

Published : Nov 18, 2019, 2:00 PM IST

पुणे - महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेतील सध्याचे संख्याबळ पाहता महापौर भाजपचाच होणार हे जवळपास निश्चित असल्याने मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

murlidhar mohol news
महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीसाठी भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर करण्यात आले

भाजपकडून महापौर पदासाठी अनेकजण इच्छुक होते. त्यामुळे भाजपकडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का, याबाबत उत्सुकता असतानाच मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर झाल्याने अन्य नेत्यांच्या आशा मावळल्या आहेत.

मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. तसेच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात मोहोळ हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मैदानात दंड थोपटून उतरले होते. याचेच बक्षीस मिळाल्याची चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.

मोहोळ हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी स्वत: कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना त्याग करावा लागला.
सध्या महापालिकेत भाजपला संपूर्ण बहुमत असून, त्यांचे 97 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादीकडे 39 नगरसेवक आहेत. तसेच शिवसेना 10, काँग्रेस 9, मनसे 2 आणि इतर 5 नगरसेवक आहेत.

भाजपचा महापौर होणार हे निश्चित असतानाही काँग्रेस व राष्ट्रवादीने ही निवड एकतर्फी होऊ न देण्यासाठी आघाडीकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Intro:पुणे महापौर पदासाठी भाजप कडून मुरलीधर मोहोळBody:mh_pun_01_pune_mayor_election_av_7201348

anchor
पुणे महानगरपालिकेच्या आगामी महापौर पदाच्या उमेदवारीकरिता भाजपने मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर केले आहे. महापालिकेतील संख्याबळ पाहता पुण्याचा महापौर हा भाजपचाच होणार हे निश्चित असल्याने मुरलीधर मोहोळ हे पुढील महापौर असणार यावर शिक्कामोर्तब झालाय....भाजप कडून महापौर पदासाठी अनेक जण इच्छुक होते त्यात मुरलीधर मोहोळ यांनी यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवलं होतं त्यामुळे भाजप कडून नव्या चेहऱ्याला संधी दिली जाणार का याबाबत उत्सुकता असताना मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर झाल्याने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ्याग करणार्‍या मुरलीधर मोहोळ यांना त्यांच्या त्यागाची किंमत मिळाली अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे, मोहोळ हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी कोथरूडमधून आमदारकी लढवण्यासाठी चांगलीच तयारी केली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासाठी त्याग करत पाटील यांचा प्रचार करण्याचा मार्ग स्वीकारला आणि त्यांना त्याचेच फळ मिळाल्याचे बोलले जात आहे. सध्या पुणे महापालिकेत भाजपला निर्विवाद बहुमत असून त्यांचे 97 नगरसेवक आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 नगरसेवक आहेत...दरम्यान भाजपचा महापौर होणार हे निश्चित असले तरी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवड एकतर्फी होऊ न देण्यासाठी आपला उमेदवार उभा केलाय आघाडीकडून राष्ट्रवादी चे नगरसेवक प्रकाश कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.