पुणे - सारथी संस्थेत सुरू असलेल्या तारादूत आंदोलनाला खासदार संभाजीराजे छत्रपती भेट देणार आहेत. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या सारथी संस्थेतील तारादूत हे विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसांपासून पुण्यातल्या सारथी संस्थेच्या बाहेर आंदोलन करत आहेत.
सहा दिवसांपासून सुरू आहे आंदोलन
दरम्यान, सहा दिवस उलटूनही त्यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली नाही. आज तारादूत सेवकांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून खासदार संभाजीराजे छत्रपती हे सारथीच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. दूपारी ते या आंदोलनात सहभागी होतील. आज संभाजीराजे तारातूद सेवकांचे म्हणणे ऐकून घेऊन राज्य सरकारला काय इशारा देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.