पुणे - भाजप केंद्रीय संसदीय समिती आणि केंद्रीय निवडणूक समितीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये केंद्रीय निवडणूक समितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना स्थान देण्यात आलं आहे. याबाबत फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने केली bramhan mahasangh letter bjp devendra fadnavis candidate pune loksabha आहे. त्याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहण्यात आलं आहे. यावर आता खासदार गिरीश बापट यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली mp girish bapat on dcm devendra fadnavis आहे.
श्रावणा निमित्ताने एका गिरीश बापटांनी आजोजन केलं होते. तेव्हा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी याप्रकरणावर गिरीश बापट यांना प्रश्न विचारला. त्यावरती बोलताना गिरीश बापट म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी काही संघटनांनी मागणी केली आहे. त्याबाबत मला काहीही हरकत नाही. जर तसं झालं, तर मला खूपच आनंद होईल. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाच आणि दृष्टीचा नक्कीच फायदा होईल, असे स्पष्टीकरण बापट यांनी दिलं आहे.
भाजपाचा कार्यकर्ता शिस्तबद्ध आहे. मी काय देवेंद्र फडणवीस काय आम्ही सर्वजण पक्षाचा आदेश मानणारे लोक आहे. पक्ष जे सांगेल ते अंतिम निर्णय असं आम्ही मानतो. आम्ही पक्षाच्या आदेशाच्या बाहेर नाही. पक्ष जे सांगेल ते आम्ही करु. ज्या संघटनेने मागणी केली आहे, ती त्यांची मागणी आहे. आम्ही पक्ष वाढ आणि पक्षासाठी काम करणारे लोक आहे, असेही खासदार बापट यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - Uddhav Thackeray शिवसेना कोणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, उद्धव ठाकरे म्हणतात, जे होईल ते होईल