ETV Bharat / city

पुणे शहरात 766 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, चौघांचा मृत्यू

पुणे शहरात गुरुवारी (दि. 25) 766 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून बाधितांची एकूण संख्या 2 लाख 462 वर पोहोचली आहे. सध्या 3 हजार 930 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पुणे महापालिका
पुणे महापालिका
author img

By

Published : Feb 26, 2021, 2:08 AM IST

पुणे - शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत असून गुरुवारी (दि. 25) सलग तिसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या सातशेच्या वर गेली असून चार बाधितांची उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवारी शहरात नवे 766 रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांची एकूण संख्या 2 लाख 462 इतकी झाली आहे.

दरम्यान, आज दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात सध्या 231 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी करोनाबाधीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामधील 3 रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

3 हजार 930 सक्रिय रुग्ण

पुणे शहरात सध्या 3 हजार 930 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एकूण 4 हजार 841 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंतच एकूण 1 लाख 91 हजार 691 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. दरम्यान, गुरुवारी एकूण 6 हजार 556 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.

हेही वाचा - इंदापूर तालुक्यातील बोराटवाडीच्या सुपुत्रास आसाममध्ये वीरमरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.