ETV Bharat / city

खुशखबर.. तो येतोय.. मान्सून उद्या महाराष्ट्रात होणार दाखल..!

author img

By

Published : Jun 9, 2020, 4:03 PM IST

Updated : Jun 9, 2020, 5:34 PM IST

राज्यात उद्या मान्सून दाखल होणार असून ११ तारखेपासून त्याचा वेग वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पाच दिवसांत मान्सून पूर्ण राज्य व्यापून टाकेल, असे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

monsoon in maharashtra
महाराष्ट्रात लवकरच मान्सून होणार दाखल; पुणे वेधशाळेचा अंदाज

पुणे - राज्यात अनेक ठिकाणी पूर्वमान्सूनला सुरुवात झाली आहे. यामुळे आता मान्सूनची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. उद्या राज्यात मान्सून दाखल होणार असून ११ तारखेपासून त्याचा वेग वाढणार असल्याचा अंदाज हावामान खात्याने वर्तवला आहे. तसेच पाच दिवसांत मान्सून पूर्ण राज्य व्यापून टाकेल असे वेधशाळेचे हवामान विभागप्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

मान्सूनला सध्या पोषक वातावरण आहे, त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात १५ तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस पडणार असल्याचे ते म्हणाले. कोकण गोव्यात ११ तारखेपासून पुढील पाच दिवस सर्वत्र पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात देखील येणाऱ्या 11 तारखेपासून मान्सून सक्रिय होणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. घाट माथ्यावर नाशिक आणि पुण्याच्या परिसरात पहिल्या टप्प्यात मुबलक पाऊस होणार असून मराठवाडा आणि विदर्भात 11 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे.

यातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मान्सून 12 तारखेला पुण्यात, तर 13 तारखेला मुंबईत बरसणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेतील हवामान विभाग प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.

Last Updated : Jun 9, 2020, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.