ETV Bharat / city

Mokka action on gangster : पुण्यात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळी विरोधात मोक्का कारवाई

author img

By

Published : Jul 25, 2022, 5:21 PM IST

पुणे (Pune) परिसरातील वारजे, एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणारा गुंड गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. या गुंडांवर(Maharashtra Control of Organized Crime Act) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) (Mokka action against gangster gang) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Mokka action against gangster gang
गुंड टोळी विरोधात मोक्का कारवाई

पुणे: (Pune) वारजे, एनडीए रस्ता परिसरात दहशत माजविणारा गुंड गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे याच्यासह साथीदारांच्या विरोधात, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले. या गुंडांवर(Maharashtra Control of Organized Crime Act) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) (Mokka action against gangster gang) कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

गणेश उर्फ शिऱ्या वाघमारे (वय २१), सचिन शंकर दळवी (वय २३), सुरज राजू मारूडा (वय २१), रखमाजी परमेश्वर जाधव (वय १९), प्रतीक संजय नलावडे (वय २१), समीर नरहरी कांबळे (वय १८) अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे आहेत. वाघमारे आणि साथीदारांनी वारजे, उत्तमनगर भागात दहशत माजविली होती. या टोळीच्या विरोधात खुनाचा प्रयत्न व लूट करणे, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर वाघमारे आणि साथीदारांच्या वर्तणुकीत बदल झालेला नव्हता. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी, वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी वाघमारे आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली.

हेही वाचा : Mumbai crime: मुंबईतील खार परिसरात महिलेवर हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.