ETV Bharat / city

Pune Mobile Theft : पुण्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट, एका वर्षात पुणेकरांचे २९ हजारांपेक्षा जास्त मोबाईल चोरीला

author img

By

Published : Dec 29, 2021, 5:25 PM IST

पुण्यात मोबाईल चोरांवर पोलिसांचा अंकुश राहिलेला दिसून येत नाही. एका वर्षात पुणेकरांचे तब्बल २९ हजार मोबाईल्स चोरीला गेले ( Pune Mobile Theft Cases Increased ) आहेत. मोबाईल चोरांच्या टोळ्यांनी पुण्यात अक्षरशः धुमाकूळच घातल्याचे पोलिसांच्या आकडेवारीवरून दिसून येते.

पुणे पोलिस
पुणे पोलिस

पुणे - पुण्यात मागील काही दिवसांत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात ( Pune Mobile Theft Cases Increased ) मोठ्या प्रमाणत वाढ झालेली दिसत आहे. गेल्या एका वर्षात पुण्यात तब्बल २९ हजार ५१५ मोबाईल चोरीला गेले आहेत. त्यापैकी फक्त ४९९ मोबाईल सापडले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी वाढली आहे. मागील वर्षी २२ हजार ९४३ मोबाईल्स चोरीला गेले होते.

पुण्यात मोबाईल चोरांचा सुळसुळाट, एका वर्षात पुणेकरांचे २९ हजारांपेक्षा जास्त मोबाईल चोरीला
मोबाईल चोरी रोखण्यासाठी पुणे पोलीस अनेक पावले उचलताना देखील दिसत आहेत. अशा वाढत्या चोऱ्या लक्षात घेता त्या रोखण्यासाठी पुणे पोलीसांनी अनेक योजना आखल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे पुणे पोलिसांची वेबसाईट ( Pune Police Website ) . या वेबसाईटवर तक्रार नोंदवली ( Pune Police Mobile Theft Complaint ) असता हा तपास केला जाऊ शकतो. पण त्यासाठी इथ तक्रार करावी लागते. माञ या गुन्ह्यात नेमकी वाढ का होत आहे? हे पाहणं देखील महत्वाचं आहे.या वाढत चालेल्या मोबाईल चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर लॉस्ट अँड फाऊंड ( Pune Police Lost And Found ) नावाचं वेगळ ऑप्शन देखील दिलं आहे. तरीही हे चोरी झालेले मोबाईल किती प्रमाणात सापडतात हे ही तितकंच महत्वाचं.या साऱ्या मोबाईल चोरांना आळा घालण्यासाठी आणि हरवलेले मोबाईल तत्काळ परत मिळावे यासाठी पुणे पोलीस पुर्ण पणे प्रयत्न करत आहेत. वेबसाइटवर तक्रार आल्यानंतर त्याची तत्काळ दखल घेतली जात आहे. मागील काही दिवसांत अशा अनेक टोळ्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी दिली आहे. एकूणच या साऱ्या कारवाईबद्दल आम्ही त्यांच्याशी बातचीत केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.