ETV Bharat / city

मंदिरे खुली करण्यासाठी मनसे आक्रमक, पुण्यात आंदोलन

author img

By

Published : Sep 2, 2021, 7:08 PM IST

Updated : Sep 2, 2021, 9:56 PM IST

राज्य सरकारच्यावतीने अजूनही मंदिरे उघडण्यात आली नाहीत. मंदिरे खुली करण्यात यावी या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, दोन दिवसाआधीच भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.

mns agitation in pune
मनसेचे पुण्यात आंदोलन

पुणे - भाजपपाठोपाठ आता मनसे देखील मंदिरे खुली करण्यात यावी या मागणीसाठी आक्रमक झाली आहे. आज मनसेच्यावतीने पुण्यातील तांबोळी जोगेश्वरी मंदिराबाहेर आंदोलन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया देताना मनसेचे नेते

हेही वाचा - तालिबानबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे- असदुद्दीन ओवैसी

  • आठ दिवसात मंदिरे उघडा नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने उघडू -

राज्य सरकारच्यावतीने अजूनही मंदिरे उघडण्यात आली नाहीत. मंदिरे खुली करण्यात यावी या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, दोन दिवसाआधीच भाजपच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आज मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी मनसेतर्फे राज्य सरकरला इशारा देखील देण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात यावा अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने मंदिरे उघडतील, असा इशारा देखील यावेळी मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिला आहे.

  • केंद्राने देखील राज्य सरकारला सूचना कराव्या -

संपूर्ण राज्यात आघाडी सरकार लॉकडाऊन लॉकडाऊन खेळत आहे. मंदिरे सोडून सर्वकाही उघडण्यात आले आहे. आज मनसेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. उद्यापासून पक्ष प्रमुख राज ठाकरे 3 दिवसीय पुणे दौऱ्यावर येत आहेत. तेव्हा राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. पुणे शहरात 70 टक्के लसीकरण झाले असतानाही मंदिरे का खुली करण्यात येत नाही? फक्त मंदिरे नव्हे तर सर्वच धर्मीय धार्मिक स्थळे उघडण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. राज्य सरकार प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. आमची केंद्र सरकारलाही मागणी आहे की त्यांनी याबाबत विचार करून राज्य सरकारला आदेश द्यावे, असे यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी सांगितले.

  • कोरोना फक्त मंदिरातच आहे का?

राज्य सरकारने आज सर्वकाही उघडले आहे. फक्त मंदिरातच कोरोना लपून बसला आहे का? आज आमच्या या आंदोलनाची सुरुवात आहे. जर सरकारने मंदिरे उघडली नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने मंदिरे उघडू, असा इशारा देखील यावेळी मनसेकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, दोन महिन्यांपासून रखडलेले वेतन मिळणार

Last Updated : Sep 2, 2021, 9:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.