ETV Bharat / city

MNS Pune Sabha : राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द, लवकरच सभेचे ठिकाण व तारीख जाहीर करणार - बाबू वागस्कर - MNS Pune rally cancelled

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द ( Raj Thackeray Pune Sabha Canceled ) झाली आहे. अशा आशयाचे पत्र पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे.

Raj Thackeray Pune Sabha Canceled
राज ठाकरे यांची पुण्यातील सभा रद्द
author img

By

Published : May 18, 2022, 7:30 PM IST

Updated : May 18, 2022, 7:55 PM IST

पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांची पुण्यात २१ मे रोजी होणारी सभा रद्द ( Raj Thackeray Pune Sabha Canceled ) झाली आहे. अशा आशयाचे पत्र पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंची सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच होणार आहे. त्याबाबत राज ठाकरे स्वतः उद्या गुरूवारी स्पष्टीकरण देतील. पण पुण्यातली सभा होणारच अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी व्यक्त केली आहे.

मनसे पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया

या कारणाने सभा रद्द - मनसे कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती घेतली असता सध्या तरी पावसाचे कारण देत नदीपात्रात होणारी सभा रद्द करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

राज यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष - राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र पावसामुळे ही सभा सद्धा रद्द करण्यात आली आहे. मागच्या तीन सभेत राज ठाकरेंनी मशिदी वरच्या भोंग्यावरून राज्य सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर मनसेने राज्यभर आंदोलन देखील केले या आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत राज ठाकरे काय बोलणार आणि आपल्या सभेतून विरोधकांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

राज ठाकरे होते पुणे दौऱ्यावर - त्यातच पुणे शहरातला मनसेत मोठी नाराजी दिसून येत आहे. मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे वारंवार इतर पदाधिकाऱ्यांवर मला डावलले जात असल्याचा आरोप करत आहेत. त्याच पार्श्भूमीवर काल आणि आज राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. त्यानंतर 21 मे रोजी होणाऱ्या सभेत राज ठाकरे नेमके काय बोलणार आहेत, यावर सगळ्याचं लक्ष लागलेल होते. मात्र आता ही सभा रद्द करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे राज ठाकरेंची सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच होणार आहे. त्याबाबत राज ठाकरे स्वतः उद्या गुरूवारी स्पष्टीकरण देतील. पण पुण्यातली सभा होणारच अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीला फटका बसेल?

Last Updated : May 18, 2022, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.