ETV Bharat / city

मनसे नगरसेवकाची रुबी हॉल क्लिनिकच्या व्यवस्थापकाला मारहाण, बिल कमी करण्यावरूनझाला वाद - पुणे मनसे

सोमवार १९ ऑगस्ट रोजी दुपारी हा प्रकार घडला. ही संपुर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे
author img

By

Published : Aug 23, 2019, 11:18 AM IST

Updated : Aug 23, 2019, 1:21 PM IST

पुणे- रुग्णालयाचे बिल कमी करण्यावरून झालेल्या वादातून पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी रुबी हॉल क्लिनिकच्या व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. सोमवारी 19 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबी हॉल क्लिनिकमध्ये एका रुग्णावर उपचार सुरू होते. सोमवारी पुण्यातील मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर या रुग्णाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. यादरम्यान त्यांनी बिल कमी करण्यासाठी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाची भेट घेतली. दरम्यान व्यवस्थापक आणि बाबर यांच्यात बिल कमी करण्यावरून वाद झाला. यातूनच साईनाथ बाबर यांनी सदर व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आणि त्याला दमदाटी केली.

दरम्यान, हे प्रकरण वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि या दोघांनीही परस्परविरोधी तक्रार दिली. पोलिसांनी दोघांच्याही तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. साईनाथ बाबर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Intro:​(cctv footage whats)
Pune:-
रुबी हॉल क्लिनिकमध्ये घुसून मनसे नगरसेवकाची मॅनेजरला मारहाण, माहिती देण्यास पोलिसांची टाळाटाळ..

पुण्यातील वानवडी परिसरात असलेल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये घुसून मनसे नगरसेवकाने बँक मॅनेजरला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे..सोमवारी दुपारी हा प्रकार घडला..ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे...

दरम्यान वानवडी पोलिसांना याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली..ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप समजू शकले नाही..परंतु एखाद्या नगरसेवकाने अशाप्रकारे कायदा हातात घेणे कितपत योग्य आहे हा प्रश्न उपस्थित होतोय...Body:..Conclusion:...
Last Updated : Aug 23, 2019, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.