पुणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Pune Visit) हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा 15 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान होणार आहे. या दौऱ्यात राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक संवाद साधून त्यांचे मतं जाणून घेणार आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीची रणनीती या दौऱ्यात ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर (MNS leader Babu Wagaskar) यांनी दिली आहे.
- राज ठाकरे तीन दिवस साधणार पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद-
राज ठाकरे हे उद्या पुण्यात येणार आहेत. सकाळी 9 ते 11 वेळेत शिवाजी नगर मतदारसंघ आणि त्यानंतर 12 ते 2 वेळेत कोथरूड मतदारसंघ, त्यानंतर 4.30 ते 5.50 वाजता खडकवासला मतदारसंघ आणि संध्याकाळी 6 ते 7.30 वाजता हडपसर मतदारसंघ अशी बैठक होणार आहे. तर 16 डिसेंबरला सकाळी 9 ते 11 वाजता कसबा मतदारसंघ, 12 ते 2 वेळेत पर्वती मतदारसंघ, दुपारी 4 ते 5.30 वाजता कॅन्टोन्मेंट मतदारसंघ आणि संध्याकाळी 6 ते 7.30 वाजता वडगावशेरी मतदारसंघाची बैठक घेणार आहेत. शुक्रवारी 17 डिसेंबरला आजी-माजी नगरसेवक यांची बैठक होणार आहे, अशी माहिती यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली.