पुणे - मनसेचा 16 वा वर्धापन दिन हा पुण्यात साजरा होत ( MNS Foundation Day In Pune ) आहे. त्यानिमित्ताने पुण्यात जोरदार तयारी सुरु आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे मनसेचा हा वर्धापन दिन साजरा होत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय ( MNS Chief Raj Thackeray ) बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे पुण्यातून पुन्हा देणार हिंदुत्वाचा संदेश
गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपला 15 वा वर्धापन दिन साजरा केला नव्हता. त्यामुळे आज ( गुरुवार ) पार पडणाऱ्या वर्धापनदिनानिमित्त जोरदार तयारी पुण्यातील कार्यकर्त्यांनी केली आहे. या मेळाव्यात महिला भगव्या साडीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे मनसे एक प्रकारे हिंदुत्वाचा संदेश यानिमित्त देणार आहे.
राज ठाकरे काय बोलणार?
देशात आणि राज्यात सध्या जे राजकारण चालू आहे, त्यावर अनेक नेत्यांनी आपली मते मांडली आहेत. पण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र कुठल्याच प्रकरणी भाष्य केले नाही आहे.तसेच, मागील राज ठाकरेंनी अनेक दिवसांपासून कुठलीच जाहीर सभा देखील केली नाही. तसेच, मुंबई, पुणे, नाशिकसोबत अन्य महापालिकेच्या निवडणुका यंदा पार पडणार आहे. त्यामुळे आज राज ठाकरे काय बोलणार, त्यांची तोफ कोणावर धडाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - Goa Election 2022 : सुदिन ढवळीकरांचा मुख्यमंत्री पदावर दावा; चिदंबरम यांच्याशी केली चर्चा