पुणे- ट्रिपलसीट व हिरकणी या मराठी चित्रपटाला थिएटर मिळावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीने पुण्यातील किबे लक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर आंदोलन करण्यात आले. मराठी चित्रपटावर अन्याय करून हिंदी चित्रपटाला मल्टीप्लेक्समध्ये प्राईम शो दिले जातात. यांच्याविरोधात हे आंदोलन होते.
पुढील आठवड्यात ट्रिपलसीट आणि हिरकणी हे मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याच सुमारास हाऊसफुल हा हिंदी चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे थिएटर मालकांनी मराठी चित्रपटांना डावलून हिंदी चित्रपटाला स्थान देऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना आक्रमक झाली आहे. यासाठी पुण्यातील किबे लक्ष्मी चित्रपटगृहाबाहेर अभिनेता रमेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
जर मल्टिप्लेक्समध्ये सिनेमाला योग्य वेळ मिळाली नाही, तर राज्य भर आंदोलन होईल. यादरम्यान जे काही होईल त्याला सरकार जबाबदार असेल असा इशारा रमेश परदेशी यांनी यावेळी दिला.