पुणे - दिवसागणित इंधन दरवाढ होत आहे. महागाईत वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पुण्यातील अलका चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मनसेचे आंदोलन मनसेतर्फे पंतप्रधानांना पाठवण्यात येणार पत्र - गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहरात पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सह्यांची मोहीम घेत आहे. या मोहिमेनंतर या सर्व सह्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं जाणार आहे की दररोज जी पेट्रोल डिझेलची दरवाढ होत आहे, ती कमी करण्यात यावी. तसेच गेल्या ८ ते ९ महिन्यापासून गॅस सबसिडीबाबतही गोंधळ आहे. तो ही संपलेला नाही. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली आहे.
पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मनसेचे आंदोलन जनतेच्या अपेक्षांचा भ्रमनिरास झाला - आज झालेल्या बजेटच्या माध्यमातून पेट्रोल डिझेल दरवाढीबाबत दिलासा मिळेल, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने याबाबत घोर निराशा केली आहे. कृषीवर जे वाढीव अधिभार लावला आहे. याचा अर्थ असा समजायचा की यानंतर कधीच पेट्रोल डिझेलची वाढ कमी होणार नाही. हेच सांगायचा केंद्र सरकारने प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जनतेला जी अपेक्षा होती कि बजेटच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलची दरवाढ कमी होईल. पण तो दिलासा मिळणार नाहीये. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज आंदोलन करून आम्ही केंद्र सरकारला मागणी करत आहोत, कि ही दरवाढ कमी करण्यात यावी. अशी मागणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली.
पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात मनसेचे आंदोलन 'अक्कड बक्कड बंबे बो ८०, ९०, पुरे १००, इतना भी ना लूट की जनता कभी माफ ही ना करे' अशा आशयाचे फलक हातात घेत कार्यकर्त्यांनी मोदी सरकारचा निषेध केला.