ETV Bharat / city

दौंड तालुक्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा; आमदार राहुल कूल यांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट

author img

By

Published : Apr 22, 2021, 3:18 PM IST

दौंड तालुक्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा जानवत आहे. यामुळे आमदार राहुल कुल यांनी घेतली विभागीय आयुक्तांची भेट घेतली.

पुणे
पुणे

दौंड (पुणे) - कोरोनाबाधितांची संख्या जास्त वाढत आहे. या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्यातील ऑक्सिजनचा तुटवडा व रेमडेसिवीर इंजेक्शनचा होत असलेला अपुरा पुरवठा याबाबत दौंडचे आमदार राहुल कूल यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची आज भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन व रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत व्हावा -

कोरोना या संसर्गजन्य विषाणूने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. दौंड तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून डॉक्टरांकडून रुग्णांवर उपचारासाठी वापरले जाणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा अपुरा पुरवठा होत आहे. रुग्णांना अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. यामुळे रुग्णांना आवश्यक दोन्ही बाबींचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी यावेळी आमदार राहुल कुल यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.

पुरवठा सुरळीत करण्याचे संबंधित विभागांना निर्देश -

विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या मागणीची तत्काळ दखल घेऊन दौंड तालुक्यातील ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश संबंधितांना दिले असल्याची माहिती दौंडचे आमदार राहुल कूल यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.