ETV Bharat / city

Criticism of NCP chief and Jamkhed MLA : राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि रोहित पवारांवर गोपीचंद पडळकरांची कठोर टीका

भाजपचे विधान परिषदेच आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar) यांनी शरद पवार (Senior leader Sharad Pawar) आणि रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली (Criticism of Gopichand Padalkar) आहे. ते म्हणाले की, अनेक वर्षांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव अराजकीय स्वरुपात साजरा असताना या उत्सवाला यांनी राजयकीय स्वरूप देऊन (Criticism of the political nature) त्याची प्रतिष्ठा घालवली आहे.

MLA Gopichand Padalkar
आमदार गोपिचंद पडळकर
author img

By

Published : May 30, 2022, 9:58 AM IST

Updated : May 30, 2022, 1:25 PM IST

बारामती : चौंडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती उत्सव (Ahilya Devi Holkar Jayanti celebration) अराजकीय स्वरुपात साजरा होत होता. परंतु, पवार आजोबा आणि नातूने त्याला राजकीय स्वरूप दिले (Alleged to be politically motivated) असल्याची टीका भाजपचे विधान परिषदेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. बारामतीत रविवारी रात्री त्यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला. (Poisonous criticism on NCP chief and Jamkhed MLA)

अहिल्यादेवींंचा जागर कार्यक्रम : जागर अहिल्या युगाचा जागर पराक्रमी यात्रेचा कार्यक्रमांर्तगत पडळकर बारामतीत आले आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सरदार सुभानजी देवकाते यांच्या समाधिस्थळाची बारामतीतील कन्हेरी येथे पवारांकडून छेडछाड होत असल्याचा आरोप केला. ज्ञानवापीसारखा प्रकार बारामतीत घडत असल्याचे ते म्हणाले.

सरदार देवकाते समाधिस्थळ सुधारणा मागणी : शिवराज्याभिषेक दिनी जे मोजके सरदार उपस्थित होते, त्यात देवकाते यांचा समावेश होता. निष्ठा निभावणे हे त्यांच्या रूपाने स्वराज्याने पाहिले होते. छत्रपती राजाराम महाराजांवर संघर्षाची वेळ आली, त्यावेळी सुभानजी अग्रस्थानी होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत ते जंजीरा मोहिमेत होते. त्यांना इनामकीपोटी ४५३ गावांची इनामकी मिळाली होती. त्यात बारामती तालुक्यातील काटेवाडीसह आजूबाजूच्या गावचा समावेश होता. काटेवाडी मूळची देवकातेंची आहे. परंतु, मोघल प्रवृत्तीच्या पवारांनी इथे अनेक गोष्टीत अतिक्रमण केले आहे.

शरद पवारांवर टीका : बहुजनांच्या इतिहासाचे लचके तोडण्याचे काम ते करीत आहेत. अनेकांचे पाणी पळवणे, जमिनी लाटणे यांसह आता इतिहासाचे लचके तोडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. ज्ञानवापी मशिदीचा विषय सध्या देशभर गाजतो आहे. परंतु, इथे कन्हेरीत सुभानजी देवकाते यांच्या समाधिस्थळाच्या बाबतीत हाच प्रकार घडतो आहे. बाजूलाच शिवसृष्टी उभी राहत असताना सुभेदाराच्या समाधिस्थळावर अन्याय केला जात आहे. शासनाने येथे त्यांचे उचित स्मारक उभे करावे, जीवनपट उलगडेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादीवर पडळकरांची टीका : पडळकर म्हणाले, ज्या दाऊद इब्राहीमने मुंबईत बॉंबस्फोट केला. त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्याची बहिण हसीना पारकर हिच्यासोबत नवाब मलिक यांनी आर्थिक व्यवहार केले. अशा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, दाऊदचे पैसे वापरणाऱ्या, ज्यांच्या पैशाला हिंदूचे रक्त लागले आहे, अशा लोकांच्या पैशांचा गैरवापर ते अहिल्यादेवी जयंतीनिमित्त करीत आहेत, असा आरोप पडळकर यांनी केला.

हेही वाचा : गोपीचंद पडळकरांवर गुन्ह्यांची बत्तीशी; गृह राज्यमंत्र्यांनी काढली विरोधकांच्या आरोपातील हवा

Last Updated : May 30, 2022, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.