ETV Bharat / city

Pune Crime News : पुण्यात दिव्यांग अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दारु पाजून केले अश्लिल कृत्य - दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचे अपहरण

पुण्यातील हडपसर काळेपडळ येथील घराजवळ खेळत असलेल्या एका दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचे दोघांनी अपहरण केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केल्याची घटना समोर ( minor handicapped girl molested in Pune ) आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली.

Pune Crime News
दिव्यांग अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन दारु पाजून केले अश्लिल कृत्य
author img

By

Published : May 23, 2022, 7:29 PM IST

पुणे - पुण्यातील हडपसर काळेपडळ येथील घराजवळ खेळत असलेल्या एका दहा वर्षाच्या अल्पवयीन दिव्यांग मुलीचे दोघांनी अपहरण केले. त्यानंतर तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजता घडली. याप्रकरणी एका 32 वर्षाच्या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी राठोड नावाचा व्यक्ती आणि त्याच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण, विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण - मुलगी बेपत्ता झाल्याचे रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लक्षात आल्यावर तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. तेव्हा रात्री साडेअकरा वाजता ती मिळून आली. आरोपी राठोड यानेच मुलीला रडत असलेल्या अवस्थेत परिसरात आणून सोडले होते. हा प्रकार काही नागरिकांनी पाहिला. मुलीचे नातेवाईक तिचा शोध घेत असताना नागरिकांनी मुलीला सोडणार्‍या व्यक्तीची माहिती दिली. त्यानुसार तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत राठोड आणि त्याच्या साथीदाराच्या विरुद्ध तक्रार दिली आहे.

दारु पाजून केले अश्लिल कृत्य - तक्रारदार महिलेची 10 वर्षाची मुलगी दिव्यांग असल्यामुळे तिला बोलता येत नाही. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास ती घराजवळ असलेल्या कॉलनीत खेळत होती. यावेळी मोटारसायकलवरुन दोघे जण आले होते. त्यांनी तिला आमिष दाखवून मोटारसायकलवरुन जबरदस्तीने उचलून नेले. तेथे मुलीच्या अज्ञान व दिव्यांगपनाचा फायदा घेऊन राठोड व त्याच्या साथीदाराने दारू पाजून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करून विनयभंग केला. तसेच तिचे केस ओढून लैंगिक छळवणूक केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा - Monsoon Latest Update : यंदा मान्सून एक आठवडा आधीच, काय आहेत कारणे? पहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.