पुणे - 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे पुणे रेल्वे स्थानकावरून अपहरण करून तिच्यावर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कार करणाऱ्यांमध्ये दोन रेल्वेचे कर्मचारी आणि रिक्षाचालक तसेच इतरांचाही समावेश आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत, आठ आरोपींना अटक केली आहे. 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत हा प्रकार घडला होता.
हेही वाचा - करुणा मुंडे प्रकरण : वाहनात सापडलेल्या पिस्तूल प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
- अपहरण करून बलात्कार -
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, 31 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास पीडित तरुणी गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी आरोपींनी इतक्या रात्री गावी जाण्यासाठी गाडी मिळणार नाही. आजची रात्र तुझी राहण्याची व्यवस्था करतो असे सांगून तिला रेल्वे स्थानकाबाहेर आणले आणि रिक्षात बसवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला वानवडी परिसरात घेऊन जात आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला.
- आरोपींना अटक
दरम्यान, रविवारी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वानवडी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत आरोपींची धरपकड केली. आरोपींमध्ये दोन रेल्वे कर्मचाऱ्यांचा तर काही रिक्षाचालकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली असून, यामध्ये आणखी एक आरोपी सहभागी असण्याची शक्यता आहे. त्याचा देखील शोध पोलीस घेत आहेत.
हेही वाचा - ..तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचे आवाहन