पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील वडगांव बुद्रुक येथे मैत्रिणीसोबत गप्पा मारत बसलेल्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घालून खून (minor boy killing due to love affair) करण्यात आला आहे. नागेश सिद्धाप्पा चिंचोळे (वय १७, रा. जाधव नगर, वडगाव बुद्रुक, पुणे) असे खून (minor boy murder Pune) झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk minor murder) येथे घडली. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
डोक्यात बिअरची बाटली फोडली - मयत नागेश हा वडगाव बुद्रुक येथील पाऊंजाई मंदिर पाठीमागील घुले नगर परिसरात असणाऱ्या बंटी बबली पॉइंट वर मोकळ्या प्लॉटमध्ये एका मैत्रिणी सोबत गप्पा मारत बसला होता. दरम्यान त्या ठिकाणी एका तरुणाने येऊन नागेश याच्या डोक्यात बिअरची बाटली व झाडाची कुंडी घातली. यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. प्रेम प्रकरणातून हा खून घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.