ETV Bharat / city

Ramdas Athavale Pune : तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही - रामदास आठवले - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले पुणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढे काम केले आहे, की 2024 मध्ये पुन्हा एकदा एनडीएचा झेंडा संसदेत फडकणार आहे. अशा भेटीगाठी होत असतात आणि याचा नुकसान आम्हांला होणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale ) यांनी दिली आहे.

मंत्री रामदास आठवले
मंत्री रामदास आठवले
author img

By

Published : Feb 20, 2022, 5:34 PM IST

पुणे - देशाच्या राजकारणात बदल करण्याच्या उद्देशाने केंद्रातील भाजपा ( BJP ) सरकारवर ताशेरे ओढणारे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर ( Telangana Chief Minister KCR ) मुंबई दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Chief Minister Uddhav Thackeray and NCP President Sharad Pawar ) यांच्या भेटीसाठी ते मुंबईत आले आहे. प्रत्येक नेत्यांना भेटण्याचा अधिकार आहे. तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढे काम केले आहे, की 2024 मध्ये पुन्हा एकदा एनडीएचा झेंडा संसदेत फडकणार आहे. अशा भेटीगाठी होत असतात आणि याचा नुकसान आम्हांला होणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Union Minister of State for Social Justice Ramdas Athavale ) यांनी दिली आहे. ते आज (रविवारी) पुण्यात बोलत होते.

प्रतिक्रिया देताना मंत्री रामदास आठवले
  • 'चंद्रशेखर राव यांना समुद्रात बुडावल्या शिवाय राहणार नाही'

आमच्या विरोधात जे आहे ते एकत्र नसले तरी ते विरोधक आहे आणि एकत्र आले तरी विरोधकच आहे. त्यांना काही भूमिका मांडायची आहे ती भूमिका त्यांनी मांडावी. आम्हाला काहीही फरक पडत नाही. चंद्रशेखर राव हे उलट सुलट बोलणारे मुख्यमंत्री आहे. ते जर भाजपा बंगालच्या खाडीत टाकणार असेल तर आम्ही त्यांना कन्या कुमारी येथील समुद्रात बुडावल्या शिवाय राहणार नाही, असे देखील यावेळी आठवले म्हणाले.

  • 'दोस्त दोस्त ना राहा, दुश्मन दोस्त झाला'

राज्यात जे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे, त्यावर आठवले म्हणाले, की जी भाषा सध्या बोलली जात आहे ती बोलू नये. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण आरोप प्रत्यारोप करत असताना भाषेबाबत तारतम्य वापरायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकाळात मॅनेजमेंट होते. सध्या मॅनेज चालले आहे. हा वाद मिटला पाहिजे. मुख्यमंत्री यांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढे यायला हवे. पून्हा एकदा भाजपा आणि शिवसेनेची दोस्ती होणे गरजेचे आहे. आत्ता दोस्त दोस्त ना राहा दुश्मन दोस्त झाला आहे, असेही आठवले म्हणाले.

  • 'पालिकेत 20 जागा लढवणार'

येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बरोबर रिपब्लिकन पक्ष निवडणूक लढवणार आहे. आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 20 जागा मागणार आहे. जास्तीत जास्त जागेत आम्ही जिंकू, असे देखील आठवले यावेळी म्हणाले.

हेही वाचा - Chandrakant Patil On Sanjay Raut : 'संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचे कंत्राट घेतले'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.