पुणे - समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हान नवाब मलिक यांनी दिल आहे. वर्षभरात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकेल, असेही मंत्री नवाब मलिक म्हणाले. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता फोन करत आहेत की यात माझा संबंध नाही. समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे मलिक म्हणाले. ते मावळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नवाब मलिक यांनी क्रूजवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर देखील अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलतांना मलिकांनी आता त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच त्यासंदर्भातले फोटो देखील आपण देणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत. याप्रकरणात समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हान मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे.
हेही वाचा - अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपली, तब्बल 2 तास चालली चौकशी