पुणे - विधानसभा अध्यक्ष या ( Speaker of The Legislative Assembly ) अधिवेशनात होणार हे नक्की आहे. यंदा कोणतीही अडचण येणार नाही. 2 ते 3 दिवसांचे अधिवेशन असल्याने नियमात बदल करून त्याच अनुकरण आम्ही यंदाच्या अधिवेशनात करु, असे मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Revenue Minister Balasaheb Thorat ) यांनी व्यक्त केला आहे. सुवर्ण विजय द्विसप्ताह निमित्ताने सर्व शहिद जवानांच्या अभिवादन आणि काल झालेल्या विमान दुर्घटनेत निधन पावलेल्या सीडीएस बिपीन रावत यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
- '13 तारखेनंतर निर्णय घेऊ'
ओबीसी आरक्षणाबाबत फक्त ओबीसी जागांनाच स्थगिती आलेली आहे. सामाजिक तणाव निर्माण होऊन निवडणूक घेणे चुकीचे आहे. त्यासाठी राज्य सरकार म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात शासन म्हणून लढत आहोत. येणाऱ्या 13 तारखेला सुप्रीम कोर्टाच्या तारखेनंतर याबाबत निर्णय घेऊ. केंद्र सरकारकडे जो इमपेरिकल डेटा आहे, त्याची मागणी आम्ही करीत आहोत, असे देखील यावेळी थोरात म्हणाले. भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे, तो या देशाच्या हिताचे नाही. म्हणून यूपीए आहे आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यूपीए आहे. शिवसेना नेते संजय राऊत पुढाकार घेत आहे आणि येणाऱ्या काळात यूपीए भक्कमपणे उभे राहणार आहे, असे देखील यावेळी थोरात म्हणाले.
- 'कालच्या घटनेची सखोल चौकशी व्हायला पाहिजे'
कालची जी घटना झाली आहे, ती अत्यंत दुर्दैवी असून सीडीएस बिपीन रावत यांच्या अपघाताची चौकशी व्हावी. एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याच्या बाबतीत जर असे होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. पुढील काळात खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे देखील यावेळी थोरात म्हणाले.
हेही वाचा - Shelar Vs Pednekar : आशिष शेलारांना गप्प करण्यासाठीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला - देवेंद्र फडणवीस