ETV Bharat / city

...मग सुप्रिया सुळे अजित दादाच्या मतांशी सहमत नाही का? - महापौर मुरलीधर मोहोळ

महापालिकेच्या कामाचा कौतुक सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार यांनी स्वतः हा केले. मग मला असे वाटतंय कि अजित दादाच्या मतांशी ताई सहमत नाही, असा टोला पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे.

महापौैर मुरलीधर मोहोळ
महापौैर मुरलीधर मोहोळ
author img

By

Published : Jun 25, 2021, 6:21 PM IST

पुणे - गेल्या १५ महिन्यांपासून कोरोनासारख्या महासंकटाचा सामना करत असताना पुणे शहराला त्याच्यातून बाहेर काढण्याचा काम हे महापालिकेने केले आहे. या महापालिकेच्या कामाचा कौतुक सुप्रिया सुळे यांचे बंधू अजित पवार यांनी स्वतः हा केले. मग मला असे वाटतंय कि अजित दादाच्या मतांशी ताई सहमत नाही, असा टोला पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे. आंबिल ओढा प्रकरणावरून आता पुण्यातले राजकारण चांगलेच तापले आहे. या कारवाईमागे नेमके कोण आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे, असा दावा आता भाजपा नेते करत आहेत. तर झेपत नसेल तर राजीनामा द्या, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी महापौरांवर निशाणा साधला आहे. यावर आत्ता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ
'मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा आरोप'

काल (गुरूवार) आंबील ओढ्यात जी कारवाई करण्यात आली आहे, ती कारवाई महापालिका प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली घाईघाईत केली आहे. हे आत्ता पुणेकरांना समजले आहे आणि आंबील ओढ्यातील नागरिकांनाही समजले आहे. कदाचित सुप्रियाताईनाही हे कळाले असल्याने त्यांनी या मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा आरोप केला आहे. वास्तवाची थोडी माहिती सुप्रिया सुळे यांनी घ्यावी, असेही यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

'असे वक्तव्य करणे चुकीचे'

महापालिका म्हणून आंबील ओढ्यात जी कारवाई करण्यात आली आहे. हे पुणेकरांना माहित आहे. प्रशासनालाही आम्ही याबाबत जाब विचारले आहे. प्रशासन याचे उत्तर लवकर देईल आणि हे पुणेकरांना ही कळेल. सुप्रिया सुळे यांना सत्य परिस्थिती माहित असून देखील अशा पद्धतीने वक्तव्य करणे हे चिकीच आहे, असेही यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

पुण्यात बोलतांना खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर विविध आरोप केले होते. त्यात पुण्यातील आंबील ओढ्यात जी कारवाई करण्यात आली आहे. त्या कारवाईचा आदेश पुणे महापालिकेच्या वतीने देण्यात आला होता. पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे या कारवाईला जबाबदार तेच आहे. गुरुवारी झालेल्या कारवाईची चौकशी झाली पाहिजे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याचं उत्तर दिले पाहिजे. पुण्याच्या महापौरांना एवढं झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टिकाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली होती.

हेही वाचा -भाजपासारख्या पक्षाने सुडाचे राजकारण करणं दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.