पुणे - राज्यासह पुण्यात गेल्या महिन्याभरापासून मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सुरुवातीच्या कोरोनापेक्षा आत्ताचा हा कोरोना घातक असून यात सर्वच्या सर्व कुटुंबियांना बाधा होत असल्याचे दिसून येत आहे. कदाचित हा महाराष्ट्रातच तयार झालेला कोरोनाचा नवीन व्हायरस असू शकतो, अशी शक्यता इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा - राजापूर रिफायनरी'प्रकल्प हातातून गमावणे महाराष्ट्राला परवडणार नाही - राज ठाकरे
सध्या बाधितांमध्ये सर्वाधिक तरुण -
गेल्या महिन्याभरापासून पुणे शहरात सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असली तरी यात लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ तसेच आजार असलेल्या नागरिकांना कोरोना होत होता. पण आत्ताच्या बाधितांमध्ये सर्वाधिक बाधित हे तरुण आहेत. त्यामुळे पुणे शहरात सुमारे पाच हजार रुग्ण घरीच विलगीकरणमध्ये आहेत. उर्वरित रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
हे ही वाचा - सातारा : कराड तालुक्यातील अंबवडे-कोळेवाडीजवळ दुचाकीचा अपघात; दोघांचा मृत्यू
वाढत्या रुग्णसंख्येला पुन्हा लॉकडाऊन हा पर्याय नाही -
राज्यासह पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारने विविध उपाय योजना करावी. दंडात्मक कारवाईवर जास्त भर दिला पाहिजे. पुन्हा लॉकडाऊन हा रुग्ण संख्या आटोक्यात आणण्याला पर्याय नाही, असेही यावेळी डॉ.अविनाश भोंडवे यांनी सांगितले.