पुणे - पुणे शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या खेड - शिवापूर टोल नाक्याचा वाद पुन्हा एकदा सुरू झाला आहे. याच टोल नाक्याच्या संदर्भात कृती समितीची बैठक काल पुण्यात पार पडली. या बैठकीमध्ये कामगारदिनी पुढील रविवारपासून जन आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
खेड शिवापूर टोलनाका हाटव समितीच्यावतीने बैठक पार पडली. या बैठकीत सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. प्रामुख्याने खेड शिवापूर टोल हाटवा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली आहे. या आंदोलनाचा पहिला टप्पा 1 मे पासून कात्रज चौकातून प्रारंभ होणार आहे. आंदोलनाच्या माध्यमातून जणजागृती केली जाणार आहे. 25 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 80 किलोमीटरची टोल वसुली करण्यात येत आहे. ज्या महामार्गाच्या कामाचा टेंडर 2010 रोजी झाले होते त्याचे काम हे 2012 पर्यंत पूर्ण करण्याची हमी देण्यात आली होती. तरी देखील 10 वर्षे होऊनसुद्धा अद्याप काम पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून हा टोल नाका नागरिकांची लूटमार करत आहे, असा आरोप बैठकीत करण्यात आला.
पुणे शहर तसेच आजूबाजूला असलेले भोर, वेल्हे, मुळशी, हवेलीमधील नागिरकांनी टोल फ्री साठी 2016 रोजी आंदोलन केले होते. त्यानंतर टोल फ्री करण्यात आले होते. मात्र, 1 मार्च रोजी टोल पुन्हा घेण्यास सुरवात केली आहे. म्हणून या विरोधात जन आंदोलन उभा करण्यात येणार असल्याचे कृती समिती अध्यक्ष माऊली दारवटकर यांनी सांगितले.