पुणे - बस थांब्यावर थांबलेल्या एका व्यक्तीने आपला मोबाईल हिसकावून नेण्यास चोरट्यांना विरोध केल्याने त्यांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्वारगेट परिसरातील बसस्थानकाजवळ ही घटना घडली. स्वारगेट पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर हा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. नागेश दगडू गुंड (वय 37) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नागेश गुंड हे तुळजापूरचे रहिवाशी आहेत. ते बदली चालक म्हणून काम करतात. परंतु, लॉकडाऊनच्या काळात काही काम नसल्यामुळे तो मूळ गावी परत गेले होते. त्यांना बावधन येथून नाशिक येथे जाण्यासाठी बदली काम मिळाले होते. त्यासाठी ते पुण्यात आला होता. रात्री अकरा वाजता मित्र घेण्यासाठी येणार असल्यामुळे ते स्वारगेट परिसरातील एका बस थांब्याजवळ थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याचा मोबाईल चोरून नेण्याचा प्रयत्न केला. नागेश यांनी विरोध केला असता, चोरट्यांनी धारदार शस्त्राने त्यांच्या मांडीवर वार केले आणि खिशातील रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेला.
दरम्यान, काही वेळाने नागेश यांचा मित्र त्यांना घेण्यासाठी आला असता ठरलेल्या बस थांब्यावर नागेश दिसले नाहीत. त्याने शोधाशोध केली असता ते बस थांब्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. मित्राने याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून जखमी अवस्थेतील नागेश यांना रुग्णालयात नेले. परंतु, वाटेत त्याचा मृत्यू झाला होता. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पुण्यात चोरीला विरोध करणाऱ्या 37 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राचे वार करून खून - Nagesh Gund News
स्वारगेट परिसरातील बसस्थानकावर थांबलेल्या बस चालकाने मोबाईल हिसकावून नेण्यास चोरट्यांना विरोध केल्याने त्यांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. मृत नागेश गुंड हे तुळजापूरचे रहिवाशी आहेत. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.