ETV Bharat / city

पुण्यात बर्गरमध्ये आढळले काचेचे तुकडे, ग्राहक थेट आयसीयूत

पुण्यात 'बर्गर किंग'च्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे.

author img

By

Published : May 21, 2019, 5:58 PM IST

बर्गर

पुणे - फर्ग्युसन रस्त्यावरील 'बर्गर किंग'च्या बर्गरमध्ये काचेचे तुकडे आढळल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये साजिद खान या तरुणाच्या गळ्याला जखम झाली आहे. ही घटना १५ मे रोजी घडली असून डेक्कन पोलीस ठाण्यात याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

साजिद खान हा बुधवारी मित्रांसोबत बर्गर खाण्यासाठी फर्ग्युसन रस्त्यावरील 'बर्गर किंग'मध्ये गेले होते. बर्गर खात असताना त्यांच्या घशाला त्रास झाला. काही वेळाने त्यांच्या घशामधून रक्त यायला लागले. मित्रांना बर्गरविषयी शंका आल्याने त्यांनी बर्गरची तपासणी केली असता त्यांना त्यात काचेचा तुकडा आढळून आला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे.

घटनेनंतर साजिद खान यांनी डेक्कन पोलिसात याची तक्रार दिली. पोलिसांनीही 'बर्गर किंग' या हॉटेलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बर्गर किंग हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Intro:Pune:- (police byte FTP) फर्ग्युसन रस्त्यावरील बर्गरकिंगमध्ये बर्गर खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या बर्गरमध्ये आढळले काचेचे तुकडे...यामध्ये साजिद खान या तरुणाचा गळ्याला जखम..डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल...

Body:फिर्यादी साजिद खान हा बुधवारी (15 मे) मित्रांसोबत बर्गर खाण्यासाठी फर्ग्युसन रस्त्यावरील बर्गर किंगमध्ये गेला होता. तेथे जाऊन बर्गर ऑर्डर केली. ते बर्गर खात असताना त्यांच्या घशाला त्रास झाला. काही वेळाने तर घश्यामधून रक्त यायला लागले. त्यांच्या मित्रांना बर्गरविषयी शंका आल्याने त्यांनी बर्गर चेक केला असता त्यांना त्यात काचेचा तुकडा तुकडा आढळुन आला. त्यानंतर जास्तच अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात त्यांना हजर करण्यात आले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. 

Conclusion:या घटनेनंतर साजिद खान यांनी डेक्कन पोलिसात याची तक्रार दिली. पोलिसांनीही बर्गर किंग या हॉटेलच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बर्गर किंग हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.