पुणे- देशात आणि राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला सुरुवात झालीय. मात्र, बरेच दिवस घरीच असल्याने मानसिक ताण वाढू नये म्हणून लाफ्टरयोगा करण्याचे आवाहन मकरंद टिल्लू यांनी केले आहे.
लॉकडाऊनमध्ये घरीच बसलेल्या नागरिकांमध्ये ताणतणाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. कौटुंबिक ताण देखील वाढलेले आहेत. मात्र, अशा या तणावाच्या वातावरणात नागरिकांनी लाफ्टरयोगा अर्थात हास्ययोगाद्वारे मानसिक ताणतणाव कमी करावा. हास्याचा व्यायाम केल्यामुळे शरीर आणि मनाला ऊर्जा मिळते व उत्साह वाढतो, असे मकरंद टिल्लू यांनी सांगितले.
मानसिक सकारात्मकता वाढवण्यासाठी देखील लाफ्टरयोगाचा फायदा होतो, अशी माहिती लाफ्टरयोगा ट्रेनर व मोटिव्हेशनल स्पिकर मकरंद टिल्लू यांनी दिलीय. मकरंद टिल्लू हे 23 हुन अधिक वर्षे लोकांना हास्ययोग शिकवत आहेत. मानसिक तणाव आल्यास संपर्क साधावा व्हिडीओ कॉलिंगद्वारे हास्ययोगाचे मार्गदर्शन आपले कुटुंब, आपली सोसायटी, आपल्या कंपनीतील सहकारी यांच्यासाठी घ्यावा, असे आवाहन मकरंद टिल्लू यांनी केले आहे.