पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे भाषण हे प्रक्षोभक ( Raj Thackeray Aurangabad Sabha ) होते. राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेतील भाषणाबाबत कायदेशीर मत जाणून घेऊन कारवाई करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली ( Hm Dilip Walse Patil ) आहे.
वरिष्ठ चर्चा करुन कारवाई - उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जातात मग महाराष्ट्रात का नाही? ४ तारखेनंतर आम्ही अजिबात ऐकणार नाही. जिथे जिथे मशिदीवर भोंगे लागतील, तिथे हनुमान चालीसा दुप्पट आवाजाने लावणार, असा इशारा राज ठाकरेंनी ठाकरे सरकारला दिला आहे. त्यावर औरंगाबादचे पोलीस आयुक्त राज ठाकरेंच्या सभेचा अहवाल डिजींकडे पाठवतील आणि त्यानंतर वरिष्ठ चर्चा करून कारवाई करायची ते करतील, असे गृहमंत्री वळसे पाटलांनी स्पष्ट केले आहे.
राज ठाकरेंकडे मुद्दे नाहीत - कालच्या सभेत पवार आणि भोंगे याशिवाय काही नव्हते. राज ठाकरे यांच्याकडे बोलायला मुद्दे नाहीत. राज ठाकरेंनी आरोप केल्याने पवार साहेबांवर काही फरक पडत नाही. समाजाला उभे करण्याचे काम पवार साहेबांनी केली आहे. ज्यांच्याकडे काही कार्यक्रम नाहीत ते टीका करतात. पवार साहेब नास्तिक असले आणि नसले यात काय फरक आहे. राज्य घटनेने दिल्यानुसार प्रत्येकाला धर्माच्यानुसार जीवन जगण्याचा अधिकार आहे. पवार नास्तिक आहेत हा काही मुद्दा नाही. इंधन दरवाढ यावर राज ठाकरे बोलत नाहीत, अशी टिका देखील वळसे पाटीलांनी केली आहे.
दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य - मनसेच्या सभेला परवानगी देताना पोलिसांनी नेत्यांनी भाषणात दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, असे वक्तव्य करू नये या सह काही अटी नोटीस मध्ये सांगण्यात आले होते. मात्र, राज ठाकरेंनी मस्जिदीच्या भोंग्यावरून केलेल्या टिकेत काही आक्षेप असणारी वक्तव्य केली. त्याचबरोबर सभेत 15 हजार लोक सभेला उपस्थित असावी, असे सांगण्यात आले. पण, प्रत्यक्षात साठ ते सत्तार हजार लोक हजर होते. आवाजाचे डेसिमल देखील अधिक होते. त्यामुळे आता सभेच्या रेकॉर्डिंग तपासून त्यात काही चुकीचे आढळले तर करवाई केली जाईल, अशी माहिती औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी दिली.
तीन अटींचे उल्लंघन -
- या सभेत ध्वनी प्रदूषणाच्या अटीचे उल्लंघन झाले. ज्या ठिकाणी सभा झाली तो रहिवासी भाग असल्यामुळे डेसिबलची मर्यादा 50-55 एवढी होती. परंतु, सभेला आलेल्या लोकांची संख्या पाहता ही अटीचे इथे पालन झाले नाही.
- 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने कोणताही धर्म, प्रांत, वंश, जात यावरुन कोणाचा अनादर होईल, अशी वक्तव्ये करु नये. पण, राज ठाकरेंचे भाषण पाहिल्यास हे देखील अट इथे पाळली गेली नाही.
- 15 हजार लोकचं या सभेला बोलवावेत, अशी अट होती. मात्र, राज ठाकरेंची सभा पाहिल्यास १५ हजारांपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. खरंतर ही अट पाळणं त्यांच्याही हातात नव्हते.
हेही वाचा - Shivaji Maharaj Samadhi Controversy : 'लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीत भ्रष्टाचार केला'