पुणे - राज्यातील महाविद्यालयातील युवक-युवतींचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी मिशन युवा स्वास्थ्य राबविण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2021 या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते.
महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना लसीकरण उदय सामंत म्हणाले, राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. युवकांचे लसीकरण केले जावे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या समन्वयाने हे अभियान राबविण्यात येत आहे. अभियानात महाविद्यालय परिसरातच विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक असणारे लसीकरण कक्ष, विश्रांती कक्ष आणि निरीक्षण कक्ष उभारण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपवण्यात आली आहे.
लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण -
राज्यात उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सुमारे पाच हजार संस्था आहेत. त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी, खासगी विद्यापीठे अशा सर्व संस्थात मिळून सुमारे चाळीस लाख विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना या अभियानाच्या कालावधीत लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. परीक्षा ऑफलाईन लाईन होणार दरम्यान राज्यात ऑफलाईन शाळा सुरू झाल्या असून यंदा परीक्षा देखील ऑफलाईन घेण्याचा प्रयत्न असल्याचे सामंत यांनी सांगितले. मात्र, याबाबत विद्यार्थी आणि तज्ञांचे मत विचारात घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती