बारामती - मागील वर्षभरात महाविकास आघाडीने खूप संघर्ष केला आहे. कोरोना महामारी व त्यानंतर आलेल्या अतिवृष्टीच्या काळात सरकारने उत्तम काम केले आहे, असे मी म्हणत नाही तर केंद्र सरकारचा अहवाल सांगत आहे. तसेच देश-विदेशातून येणाऱ्या लोकांकडूनही महाराष्ट्राने उत्तम काम केल्याची पावती देतात. बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी असे प्रतिपादन केले.
पदवीधर निवडणुकीच्या मतदानाचा आज सुळे यांनी बारामतीत हक्क बजावला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विरोधकांना बोलण्यासारखे काहीच न राहिल्याने ते सातत्याने सरकार पडणार असल्याचे बोलतात. तसेच त्यांची संघटना टिकवण्यासाठी व त्यांच्या कार्यकर्त्यातील उत्साह कमी झाला आहे. त्यामुळे ते सरकार पडणार, पडणार असल्याचे वारंवार बोलतात. अशी टीका यावेळी सुळेंनी केली.
पुणे पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघात अरुण लाड आणि प्रा. जयंत आसगावकर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत.
हेही वाचा -कोल्हापूरात मतदानाला सुरुवात; जिल्ह्यात 281 मतदान केंद्र