पुणे - जगात कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढण्यासाठी सर्व देश प्रयत्न करत आहेत. भारतात आणि राज्यातही मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंध लसीकरण केले जात ( India Corona Vaccine ) आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांनी 19 जानेवारी रोजी मुंबई येथे प्रगती फाउंडेशनच्या वतीने 'व्हॅक्सीन ऑन कॉल' या महाराष्ट्रातील पहिल्या अनोख्या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ( Vaccine On Call In Pune ) केला. या उपक्रमाला पुण्यात सुरवात झाली असून, राज्यातील हा पहिला 'व्हॅक्सीन ऑन कॉल' उपक्रम आहे. उपक्रमाद्वारे कात्रज परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना घरी जाऊन लसीकरण करण्यात येत आहे.
10 हजार हुन अधिक लसीकरण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ( Corona Second Wave ) प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक प्रकाश कदम यांच्या नेतृत्वात कात्रज व परिसरातील नागरिकांसाठी स्वखर्चाने ४० बेड ऑक्सिजन व ४० बेडचे 02 हे कोव्हिड सेंटर उभारुन रुग्णांची सेवा केली. त्यानंतर आता 'लसीकरण आपल्या दारी' हा राज्यातील पहिला घरोघरी लसीकरण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पुणे शहरात कात्रज - सुखसागर नगर, बिबवेवाडी परिसरात आपण हा उपक्रम राबवण्यात येत ( katraj Vaccine On Call ) आहे. याद्वारे आतापर्यंत 10 हजार हुन अधिक लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्रतीक कदम यांनी दिली.
'व्हॅक्सीन ऑन कॉल' मार्फत ४००० नागरिकांचे लसीकरण
तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच केंद्र सरकारने व्याधी असलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस देखील देण्यात येत आहे. हेच लक्षात घेता प्रगती फाउंडेशनच्यावतीने ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन घरोघरी 'व्हॅक्सीन ऑन कॉल' हा उपक्रम सुरु करण्यात आला. या मार्फत रोज 70 ज्येष्ठ नागरिक, अपंग नागरिक यांना लस देण्यात येत आहे. आतापर्यंत ४००० नागरिंकांचे लसीकरण करण्यात आले आहे. 'व्हॅक्सीन ऑन कॉल' माध्यमातून नागरिकांच्या मागणीनुसार दुचाकीवर जाऊन मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.
नागरिकांच्या आरोग्याला आमची प्राथमिकता असणार असून ही लसीकरण मोहीम इतर लसीकरण मोहिमेसारखी नक्कीच यशस्वी होईल. नागरिक या मोहिमेला व्यापक स्वरूप देतील, असा विश्वास प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक प्रकाश कदम यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - CM Uddhav Thackeray : 'ते दिवस आठवा ज्यावेळी भाजपचं डिपॉझिट जप्त होत होतं' : उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार