ETV Bharat / city

'मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला' - चंद्रकांत पाटील न्यूज

मराठा आरक्षणाला राज्य सरकारने स्थिगिती दिल्यानंतर भाजपने राज्यात महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. राज्य सरकारमध्ये समन्वय नव्हता, असा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी आरोप केला आहे.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Sep 12, 2020, 5:17 PM IST

Updated : Sep 12, 2020, 6:45 PM IST

पुणे - मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याला महाविकास आघाडीला अपयश आले आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम राज्य सरकारने केल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

भाजपा आयोजित दिव्यांग व्यक्तीला साहित्य वाटपाच्या कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या पाठीत राज्य सरकारने खंजीर खुपसला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मराठा आरक्षण कधी मान्यच नव्हते. देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. मग मराठा समाजला आरक्षण का नाही दिले नाही, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, आताही सर्वोच्च न्यायालयात प्रकरण व्यवस्थित चालविण्यात आले नाही. नामांकित वकील देऊन काही होत नाही. कॉर्डिनेशन (समन्वय) लागते. आमच्यावेळी उच्च न्यायालयात ९० दिवस प्रकरण चालले. तर, ९० दिवस संध्याकाळी तीन तास प्रति न्यायालय भरवित होतो. काय चुकले, उद्या काय मांडायचे, अशी आम्ही तयारी केली होती.

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकारने पाठीत खंजीर खुपसला

हेही वाचा-मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सरकार तसूभरही मागे हटणार नाही - मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी कोणी मंत्री गेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीत बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली नाही. वकील हे दिशाहीन होते, असा पाटील यांनी दावा केला. मराठा मागास कसा हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये सगळे आले आहे.

हेही वाचा-मराठा आरक्षणाच्या निकालामुळे अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर-

मराठा मागास कसा, याबाबत मागासवर्ग आयोगाने २ हजार ७०० पानी अहवाल दिला आहे. हे दाखवले असते तरी, सर्वोच्च न्यायालयाची खात्री पटली असती, असा चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी ही दिली आहे प्रतिक्रिया

राज्य सरकार या प्रश्नी सुरुवातीपासून प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच दिली आहे. तळमळीने हा प्रश्न सोडवू इच्छित आहे. पण राजकारणासाठी मराठा समाजाला भडकविण्याचे आणि आगी लावण्याचे काम कुणी करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Last Updated : Sep 12, 2020, 6:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.