पुणे - लॉकडाऊनमधून शिथिलता मिळाल्यानंतर पुणे महामेट्रोचे कामकाज पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले आहे. या काळात मेट्रोच्या भुयारी मार्गाचे काम एक किलोमीटर पूर्ण झाले आहे. पिंपरी - चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे.
पिंपरी -चिंचवड ते स्वारगेट मार्गावरील काही मेट्रो भूमिगत मार्गातून जाणार आहे. या भुयारी मार्गाचे कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर काम सुरू आहे. येथून स्वारगेटला जाण्यासाठी आणि स्वारगेट येथून कृषी महाविद्यालयाकडे जाण्यासाठी 5.2 किलोमीटरचा भुयारी मार्ग आहे. येथील दोनही भुयारी मार्गाचे मागील वर्षी डिसेंबर महिन्यात खोदकाम सुरू असून यातील एक किलोमीटरचे कामकाज पूर्ण झाले आहे.